पश्चिम बंगाल: बीरभूमी जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. येथील एका सामान्य माजी सरकारी बस चालकाच्या घरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अथांग संपत्तीचा खजिना उघडकीस आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल २८.५० कोटी रुपयांची रोकड आणि १५ किलो सोन्याची नाणी व बिस्किटे जप्त केली आहेत. या अफाट संपत्तीमुळे पोलीसही अवाक झाले असून, नोटा मोजताना मशीन्सही बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बीरभूमी जिल्ह्यातील महम्मदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊचा परिसरात मिनार मंडल नावाच्या व्यक्तीचे घर आहे. मिनार मंडल हा काही वर्षांपूर्वी उत्तर बंगाल राज्य परिवहन महामंडळात बस चालक म्हणून नोकरी करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नोकरी सोडल्यानंतर तो या परिसरातील वादग्रस्त दगड व वाळू व्यापारी टुलू मंडल (उर्फ मोहम्मद नजीबुद्दीन) याच्या व्यवसायात मदत करू लागला आणि त्याच्या सिंडिकेटचा व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागला.
पोलिसांना या बस चालकाकडे बेकायदेशीर संपत्ती लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरावर अचानक छापा टाकला. जेव्हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या घरात शिरले, तेव्हा त्यांना घराच्या कानाकोपऱ्यांत, भिंतींमधील गुप्त कप्प्यांत आणि कपाटांमध्ये नोटांनी भरलेल्या ३५ हून अधिक गोण्या व ट्रंक आढळून आले. हा पैशांचा डोंगर इतका प्रचंड होता की, जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी बँकेकडून विशेष नोटा मोजण्याच्या मशीन्स मागवण्यात आल्या, मात्र सततच्या वापरामुळे मशीन्सही बंद पडल्या. तब्बल १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि ५ मोठ्या लोखंडी ट्रंका व बॉक्सच्या मदतीने ही रक्कम गोवण्यात आली.
घटनास्थळावरून रोख रकमेसह तब्बल १५ किलो सोने देखील जप्त करण्यात आले असून, या संपूर्ण जप्त मालमत्तेचे बाजारमूल्य ५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा काळा पैसा आणि सोने मुख्य सूत्रधार टुलू मंडल याच्याशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, मिनार मंडल याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
























Subscribe to my channel



