टीईटी ऑनलाइन परीक्षा : तांत्रिक त्रुटींचा मुद्दा ऐरणीवर; शिक्षक संघटना आणि परीक्षार्थ्यांकडून पारदर्शकतेची मागणी.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, परीक्षेतील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील काळात पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, आता शिक्षक संघटना आणि परीक्षार्थ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे.

परीक्षार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात परीक्षा पूर्ण होताच उमेदवारांच्या लॉगिनवर प्राथमिक गुण किंवा निकाल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच, उत्तरतालिका (रिस्पॉन्स शीट) आणि प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. जर परीक्षा विविध सत्रांमध्ये घेतल्या जात असतील, तर गुणांचे न्याय्य मूल्यमापन करण्यासाठी 'नॉर्मलायझेशन' पद्धतीचा अवलंब करावा, असाही आग्रह धरला जात आहे. तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये, यासाठी एक प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी परीक्षार्थ्यांकडून होत आहे. टीईटी ही केवळ पात्रता परीक्षा नसून, ती राज्यातील हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी आणि रोजगाराशी संबंधित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *