नाशिक: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील १२ नगरसेवकांच्या फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या 'डॅमेज कंट्रोल'साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरले असून, नाशिकमधील सर्व १५ नगरसेवक आणि स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १५) मुंबईतील 'मातोश्री'वर पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत ठाकरे नगरसेवकांशी 'वन-टू-वन' चर्चा करून त्यांच्या एकनिष्ठतेची खात्री करणार आहेत.
फुटीची धास्ती का?
राज्यात 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिवसेना (उबाठा) च्या नऊ पैकी सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याच धर्तीवर नाशिक महापालिकेतील १५ पैकी १२ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेने पक्षनेतृत्वाचे टेन्शन वाढले आहे. जरी १३ नगरसेवकांनी आपण पक्षासोबतच असल्याचे जाहीर केले असले, तरी ठाकरे गट सावध झाला असून त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाकरे गटाचे गंभीर आरोप:
गटनेते केशव पोरजे यांनी फुटीच्या चर्चांचा इन्कार करत नगरसेवक पक्षासोबत असल्याचे सांगितले. मात्र, काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिषे दाखवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. १० नगरसेवक सोबत आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन शिंदे गटाकडून दिले जात असल्याचे पोरजे यांनी म्हटले आहे.
एकनिष्ठतेची परीक्षा:
पक्षाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी नुकतीच नाशिकमध्ये नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, ज्यात सर्वांनी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला होता. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच आता थेट उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधण्याचे ठरवले आहे. बुधवारी होणारी ही बैठक नाशिकच्या राजकारणात काय वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




