जगामध्ये ' स्व ' सोडून ' लोकं ' नावाचा एक समुदाय असतो. या समुदायाला काय वाटेल याचीच चिंता माणूस सतत करत असतो. अनेक जण या लोकांच्या कल्पनेनुसार जगतात. मी स्वतःला वाटतं तसा राहिलो तर लोक काय म्हणतील? मी माझ्या इच्छेनुसार जगलो तर लोकांना काय वाटेल? मी मनासारखं वागलो तर लोक काय विचार करतील? असा विचार करूनच आजकाल बहुतांशी माणसं लोकांच्या अपेक्षानुसार जगत आहेत. याचाच अर्थ जीवन आपण जगत आहोत परंतु त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जे जीवन जगतो आहे तो मी नाही,आणि मी जगलेले जीवन माझे नाही. म्हणूनच या अशा जगण्याला अर्थ नाही. जे जीवन आपल्या स्वतःच्या संकल्पनेनुसार जगले, आपल्या विचार ध्येय आणि उद्देशाच्या निश्चितीनुसार जगले, आपल्याला वाटेल तसे मनाप्रमाणे जगत राहिले, तर ते जीवन आपले म्हणावे. आता लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यावा. आपण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि मतानुसार आपल्या जीवनाची आखणी करावी. आणि त्यानुसार पुढे चालावे. लोकही पुढे जात आहेत. कोणीही थांबलेले नाही. जग चाललेले आहे. घड्याळाचे काटे थांबलेली नाहीत. आलेला क्षण मागे जात आहे. पुढचा क्षण वर्तमान होत आहे. हातातून निसटलेला क्षण भूतकाळात जात आहे. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षा कुठे येतात ? आणि त्यांना कुठवर महत्त्व द्यायचं ? हे आपण ठरवायचं. वाच्यता न करता स्वतःला बदला.लोकं ईर्षेने तळमळतील. जगाला मोठे उत्तर शब्दांनी नव्हे तर परिवर्तनाने द्यायचे असते. तुम्ही दूर जात नाहीत तो पर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही. लोकांना रडून समजावून सांगू नका.ही जाणीव होऊ द्या की त्यांनी काय गमावले आहे. स्वार्थ असेल तिथे आपलेपणा शोधु नये. फक्त उपयोग पाहिला जातो तिथे प्रेम शोधु नये. उणीव आपल्या निवडीमध्ये असते. लोकं जसे असतात तसेच असतात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परतण्याची. आत्मकेंद्रित होण्याची. वर्तमानातच जगून निघावे. निसटलेले क्षण परत येत नाहीत, याचा चांगला अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. म्हणून आयुष्याचा उद्देश निश्चित करावा. आपल्या ध्येयपूर्ती कडे प्रामाणिकपणे, स्व-कष्टाने चालावे. रस्त्यात येणाऱ्यांची चिंता नको, कोणाचा विचारू नको, कोणाबद्दल मनात राग,द्वेष नको. आत्मसन्मान असावा, पण अहंकार नको. असंच आपल्या उद्देशाला धरून, प्रामाणिकपणे, नैतिकतेने, धैर्याने, आत्म सन्मानानं उद्देशाकडे ध्येयाकडे जाता येतं. फक्त आपण आत्मकेंद्रीत असावे. इतरांचा सन्मान आदर असावा परंतु त्यांच्या कल्पनेचा आपल्या जीवनात विचार नको. आपल्या अपेक्षा आणि कल्पनेनुसार लोक जगत आहेत का? हे आपण पाहतच नाहीत. मात्र लोकांना काय वाटते?आपण कसे असावे? म्हणून लोकांना त्यांच्या नजरेत चांगले दिसावे म्हणून आपण एक अभिनयाचे जीवन जगत असतो. आपले स्वतःचे जीवन स्वतःच्या विचाराने आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाकरिता जगावे असेच आज या ठिकाणी व्यक्त व्हावे वाटते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण





























Subscribe to my channel



