Crackdown on Prostitution in Pimpri-Talegaon: Cases Registered Against Four Women!

पिंपरी-चिंचवड: पोलिसांची वेश्याव्यवसायावर कारवाई, चार महिलांवर गुन्हे दाखल!

Crackdown on Prostitution in Pimpri-Talegaon: Cases Registered Against Four Women!
पिंपरी-चिंचवड: दि. १८ जून २०२६ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेश्याव्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तळेगाव दाभाडे आणि पिंपरी परिसरात चार स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत चार महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सीआरपीएफ गेट परिसरात १५ जून रोजी रात्री पोलिसांनी कारवाई केली. संबंधित महिलेने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत आणि शब्द उच्चारत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याचप्रमाणे १६ जून रोजी तळेगाव दाभाडे येथील पायोनियर हॉस्पिटलसमोरील परिसरात आणखी एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. दरम्यान, पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौक मार्गावरील सिटी प्लाझा लॉजसमोर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या दोन्ही प्रकरणांत महिलांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व खुणा करून नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप असून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चारही प्रकरणांतील महिला आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *