Explosion of 'Bogus' Birth Certificates in Amravati: Over 40,000 Suspicious Records Unearthed.

अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!

Explosion of 'Bogus' Birth Certificates in Amravati: Over 40,000 Suspicious Records Unearthed.
अमरावती: शासकीय सुधारणा आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चक्क 'बेनामी' आणि 'अतिरिक्त ओळख' तयार करून देणारा एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारा 'जन्म प्रमाणपत्र घोटाळा' अमरावतीमध्ये समोर आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, अमरावती महापालिकेत ४० हजारांहून अधिक संशयास्पद नोंदी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित केले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास १९,९६४ बोगस जन्म प्रमाणपत्रे देणारे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट अमरावती महानगरपालिकेपर्यंत पोहोचले आहेत.

 

घोटाळा कसा केला गेला?
केंद्र सरकारच्या 'सीआरएस' (CRS) पोर्टलवर जुनी जन्म प्रमाणपत्रे अपलोड करताना महापालिका आणि नगरपालिकांच्या जन्म-मृत्यू विभागात फेरफार करण्यात आला. नियमानुसार जुने प्रमाणपत्र जसेच्या तसे अपलोड करणे बंधनकारक होते. मात्र, अमरावती महापालिकेत 'स्पेलिंग करेक्शन' आणि 'नावात सुधारणा' करण्याच्या बहाण्याने थेट नवीन आणि बनावट व्यक्तींचे जन्म दाखले तयार करण्यात आले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे दाखले मिळवणाऱ्या लाभार्थ्यांचे वय २० ते ७५ वर्षांच्या दरम्यान आहे. अशा प्रकारे नाव बदलून प्रमाणपत्रे मिळवणे, हे बनावट ओळख तयार करून फसवणूक, फोर्जरी आणि काळा पैसा लपवण्यासाठी किंवा बेकायदेशीर कृत्यांसाठी केले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने महापालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदविली आहे.

अमरावती मनपातील आकडेवारी (१ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२६):

वर्ष २०२५: ३५,१४० संशयास्पद जन्म दाखले.

वर्ष २०२६ (केवळ ५ महिने): ५,६९३ संशयास्पद जन्म दाखले.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *