Solapur Education Shockone: 15 Illegal Schools Running, Parents Urged to Stay Alert!

सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!

Solapur Education Shockone: 15 Illegal Schools Running, Parents Urged to Stay Alert!सोलापूर : सोलापूर शहरात आठ, दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन, पंढरपुरात एक आणि सांगोल्यात चार, अशा एकूण १५ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या शाळांना दंड आकारून त्या तातडीने बंद करण्याची कार्यवाही करावी, असे कडक आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जुलै २०२५ पासून ६ एप्रिल २०२६ या कालावधीत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तब्बल १० वेळा संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. तरीदेखील, या अधिकाऱ्यांनी त्या शाळांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता जर संबंधित अधिकाऱ्यांनी या शाळांवर त्वरित कारवाई केली नाही, तर त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

'या' आहेत सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत शाळा:

  • सोलापूर शहरातील शाळा : १. नोबल विस्डम प्रि प्रायमरी स्कूल, बारा इमाम चौक २. ट्विंकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत ट्विंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, चंद्रलोक नगर (जुळे सोलापूर) ३. नारायण इ टेक्नो स्कूल, सोलापूर ४. विष्णूपंत कोळे मेमोरिअल इंग्लिश मिडीयम स्कूल ५. इकरा इस्लामिक स्कूल ॲंड मक्तब स्कूल, लोकमान्य नगर ६. श्री चैतन्य टेक्नो स्कूल, अंत्रोळीकर नगर ७. आर्यन वर्ल्ड English मिडीयम स्कूल, बॉम्बे पार्क ८. इगल एज्युकेशन सोसायटी संचलित सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल, नई जिंदगी (कुंभारी रोड)

  • दक्षिण सोलापूर : ९. एशियन इनिव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल, वळसंग १०. नाकेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव)

  • पंढरपूर : ११. फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पंढरपूर

  • सांगोला : १२. हनुमान इंग्लिश मिडीयम स्कूल (कटफळ) १३. सांगोला गुरुकूल १४. बाळूमामा गुरुकूल १५. विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, मेडशिंगी

...तर फौजदारी कारवाई केली जाणार!

"सोलापूर जिल्ह्यातील १५ खासगी स्वयंअर्थसहाय्यित अनधिकृत शाळांवर कार्यवाही करुन त्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आदेशासोबत शाळांची यादीही जोडली आहे. या शाळांनी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश देऊन शाळा सुरु ठेवल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. पालकांनीही अशा कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये." - कादर शेख (प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर)



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *