
Pune : उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देऊनही पुण्यासह राज्यातून त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबरप्लेट न लावलेल्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत दहा लाख ७० हजार वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. आठ लाख ६२ हजार वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. पुण्यात अद्यापही १५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. पण, वाहन चालकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही.
परिवहन विभागाने आतापर्यंत नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशी मुदतवाढ दिली होती. पण, या काळात अनेक वाहनचालकांनी नंबरप्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबरला मुदत संपल्यानंतरदेखील परिवहन विभागाने कारवाई सुरू केली नाही. वाहनचालकांना काही कालावधी मिळावा म्हणून थांबले; पण वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसून आल्यामुळे आता कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मुदतीपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना मर्यादित अतिरिक्त वेळ देण्यात आला असला, तरी मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान वाहनांची सुरक्षा नंबर प्लेट, विमा, पीयूसी आणि वाहनचालक परवाना यांचीही पडताळणी केली जाणार आहे. साधारण १५ फेब्रुवारीनंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. कोणत्याही वाहनधारकाला आता आणखी वेळ मिळणार नाही.
वाहनांची सुरक्षितता वाढावी, वाहनांचा गैरकृत्यांसाठी वापर टाळता यावा, वाहन क्रमांकाच्या आधारे वाहनचालकांचा माग काढणे अधिक सुलभ व्हावे आदी हेतूंनी सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात ‘एचएसआरपी ’ बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी गेल्या वर्षाीपासून मोहीमही राबविण्यात येत आहे. प्लेट बसविण्याची केंद्रेही वाढवली आहेत. नंबरप्लेट बसवलेली नसल्यात वाहनचालकांना १००० रुपयांपासून ते १०००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
राज्यात नंबरप्लेट बसविण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. पुण्यातच अजून १५ लाख वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहन विभागाने नंबरप्लेट बसविण्यासाठी आणखी दोन महिने तरी मुदतवाढ द्यावी. - बापू भावे, रिक्षा फेडरेशन
पुण्यात नंबरप्लेट बसवण्याचे प्रमाण अद्याप कमी असून, मोठ्या संख्येने वाहनांनी नियमाचे पालन केलेले नाही. काही फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक वेळेवर न आल्याने प्रक्रियेत अडथळे येत असल्याचेही दिसून आले आहे. - परिवहन अधिकारी
२५ लाख- पुण्यातील वाहनांची सुमारे संख्या
१०.७० लाख- 'एचएसआरपी' साठी नोंदणी केलेली वाहने
८.६२ लाख- नवीन नंबरप्लेट बसवलेली वाहने
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



