पुणे: जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि इस्रायल-इराण वादाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अशातच राज्यात ऐन शेतीच्या कामांच्या हंगामात डिझेलची मागणी वाढली असताना, अनेक जिल्ह्यांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोल पंपांवरून होणाऱ्या डिझेलच्या घाऊक (Wholesale) खरेदीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.
नेमकी टंचाई का निर्माण झाली? प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्या आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणावर डिझेलची गरज भासते. या कंपन्यांनी थेट तेल कंपन्यांकडून घाऊक पद्धतीने खरेदी करणे अपेक्षित असते. मात्र, तेल कंपन्यांकडून घाऊक खरेदीचा दर हा किरकोळ (Retail) विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपांच्या दरापेक्षा जास्त आहे. हा आर्थिक तोटा वाचवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी थेट तेल कंपन्यांकडून खरेदी न करता, शहरातील आणि ग्रामीण भागातील किरकोळ पेट्रोल पंपांवरून डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा वेगाने संपत असून सामान्य वाहनचालक आणि ट्रॅक्टरचलित कामांसाठी डिझेल लागणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
तहसीलदारांना चौकशीचे आदेश राज्य सरकारच्या निर्देशानंतर पुणे जिल्हा पुरवठा विभागाने सर्व तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तेल कंपन्यांकडून घाऊक खरेदीदार कंपन्यांची यादी मागवून, त्यांनी गेल्या दोन महिन्यांत कोणत्या किरकोळ पंपांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेलची उचल केली, याची सखोल चौकशी केली जात आहे.
कारवाईबाबत का आहे संभ्रम? तपास सुरू झाला असला, तरी दोषींवर किंवा अवाजवी खरेदी करणाऱ्यांवर काय कारवाई करावी, याबाबत प्रशासकीय पातळीवर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, तेल कंपन्यांनी किरकोळ पेट्रोल पंपांवर विक्रीचे कोणतेही कडक निकष किंवा मर्यादा निश्चित करून दिलेल्या नाहीत. केवळ घाऊक खरेदीदारांनी २०० लिटरच्या टाकीतच डिझेलची वाहतूक करावी, अशी एक ढोबळ अट आहे. कंपन्यांनी किरकोळ पंपावरून खरेदी करू नये असा थेट नियम नसल्याने, पंपचालकही स्वतःच्या फायद्यासाठी या कंपन्यांना किरकोळ दरात डिझेल विकत आहेत.
या तपासणीनंतर नेमकी कायदेशीर कारवाई कशी करायची, असा प्रश्न आता तहसीलदारांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता तेल कंपन्यांना तात्काळ पेट्रोल पंपांसाठी एक विहित कार्यपद्धती (Standard Operating Procedure) आणि विक्रीचे निकष ठरवून देण्याची सूचना केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा अवाजवी खरेदीवर अंकुश ठेवता येईल.
शहर
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
महाराष्ट्र
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




