भारतीय खेळाडूंना पत्नींसोबत राहण्यास मनाई, कारण की...Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात खरं फलंदाजीचा कस लागला. पण त्यातून टीम इंडियाने आपलं कौशल्य दाखवत अमेरिकेला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे विजयी घोडदौड अशीच सुरू राहावी यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहे. असं असताना दुसरीकडे बीसीसीआय आपल्या नियमांची कठोर अमलबजावणी करत आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्यास मनाई केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबियांना सहभागी करण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली होती. पण बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, 45 दिवसापेक्षा जास्त दौरा असल्यास कुटुंबियांना फार फार तर 14 दिवस राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धा फक्त एक महिन्यांची आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही.
गेल्या वर्षभरापासून द्विपक्षीय मालिकांमध्ये कुटुंबियांना संघासोबत राहण्याची परवानगी नाही. बीसीसीआयने हा नियम आताही कायम ठेवला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की टीम इंडिया व्यवस्थापनाने कुटुंबियांना सोबत प्रवास करू शकतात का? आणि राहू शकतात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बीसीसीआयने स्पष्ट सांगितलं की कुटुंबियांना खेळाडूंसोबत एकत्र राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण जर त्यांनची इच्छा असेल तर स्वतंत्र व्यवस्था करू असंही सांगितलं आहे. टीम इंडिया साखळी फेरीतील तीन सामने भारतात आणि एक सामना श्रीलंकेत खेळणार आहे.
भारताने 2025 या वर्षात ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. खरं कोविडनंतर खेळाडूंना कुटुंबियांना सोबत ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र काही खेळाडूंनी त्याचा गैरफायदा घेतला आणि वाटेल तसे वागू लागले. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम दिसून आला. इतकंच काय तर कुटुंबिय सोबत असल्याने काही खेळाडू संघाच्या बैठकांना दांड्या मारत होते. त्यामुळे बीसीसीआयने पुन्हा एकदा जुन्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




