पंजाब: आम आदमी पक्षाच्या आमदाराला ईडीचे समन्स; बेहिशोबी मालमत्ता आणि खंडणी प्रकरणात पंजाब दक्षता ब्युरोने केलीय आधीच अटक पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार रमण अरोरा यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. जालंधर सेंट्रल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार रमण अरोरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर अफरातफर) प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना २ जून रोजी जालंधर येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, जिथे प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याप्रकरणी आणि खंडणीच्या आरोपाखाली पंजाब दक्षता ब्युरोने
(Vigilance Bureau) त्यांना नुकतीच २३ मे रोजी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. ९०० पानांचे आरोपपत्र आणि खंडणीचे रॅकेटपंजाब दक्षता ब्युरोने न्यायालयात दाखल केलेल्या ९०० पानांच्या सविस्तर आरोपपत्रात आमदार रमण अरोरा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
प्राथमिक तपासात अरोरा यांच्याकडे १.१० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, आमदार अरोरा यांनी महानगरपालिकेच्या इमारत विभागातील असिस्टंट टाउन प्लॅनर (ATP) सुखदेव वशिष्ठ आणि इतर अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली होती.
हे दोघे मिळून जालंधरमधील व्यावसायिक, व्यापारी आणि निवासी इमारतींच्या मालकांना बेकायदेशीर किंवा त्रुटी असलेल्या नोटिसा पाठवायचे. त्यानंतर इमारतींवर कारवाई करण्याची किंवा सील ठोकण्याची भीती दाखवून संबंधित व्यावसायिकांकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जायची.
सुरुवातीला १० लाखांची मागणी करून २ ते ५ लाख रुपयांमध्ये तोडपाणी केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अनेक अधिकारीही जाळ्यातया मोठ्या खंडणी रॅकेटप्रकरणी केवळ आमदारच नाही, तर पालिकेच्या इमारत विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह इतर तीन जणांनाही अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी २३ मे रोजी दक्षता ब्युरोने केलेल्या कारवाईदरम्यान अरोरा यांच्या निवासस्थानातून ६ लाख रुपयांची रोकड, १.२ किलो सोन्याचे दागिने आणि ७० ते ८० बेकायदेशीर नोटिसा जप्त करण्यात आल्या होत्या, ज्यांचा वापर खंडणीसाठी केला जात होता.
जालंधर पोलिसांतही स्वतंत्र गुन्हे दाखलया प्रकरणात आणखी एक वेगळा पेच म्हणजे, जालंधर कमिशनर पोलिसांनी गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी आमदार रमण अरोरा यांच्याविरुद्ध एका पार्किंग कंत्राटदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना २२ सप्टेंबर रोजी
न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, परंतु नव्या भ्रष्टाचाराच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. आता या सर्व प्रकरणांमधील गुन्ह्यातून आलेला पैसा (Proceeds of Crime) कुठे गुंतवला गेला आणि त्याचे मनी लाँड्रिंग झाले का, याचा तपास करण्यासाठी ईडीने उडी घेतली आहे.
या ताज्या समन्समुळे पंजाबच्या राजकारणात आणि 'आप' वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



