प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:5 अक्षरांचे हे सूत्र हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना ठरू शकते‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदलावर आज सर्वत्र चर्चा होते. पण कृती मात्र‎अनेकदा प्रतीकात्मक उपायांपुरती मर्यादित राहते. हे प्रयत्न‎समस्येच्या केवळ छोट्या भागापुरतेच मर्यादित आहेत.‎प्रत्यक्षात यामागील मुख्य कारण आपले दैनंदिन आधुनिक‎जीवन आहे. आपण कसा प्रवास करतो, काय खरेदी‎करतो, काय खातो, किती ऊर्जा वापरतो, या सर्व गोष्टी‎नकळत पर्यावरणाचे नुकसान करतात आणि हवामान‎बदलाला कारणीभूत ठरतात.आपल्या रोजच्या जीवनात‎आपण प्रत्येक क्षणी पर्यावरणाची हानी करत असतो. मग‎ही सगळी घाण साफ करण्याचे काम झाडांनी करावे,‎अशी अपेक्षा ठेवतो. बिचारी झाडे आपल्यासाठी किती‎पर्यावरण वाचवणार? अनेकजण मला विचारतात की‎झाडे लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून किंवा सोलर‎पॅनल बसवूनही पर्यावरण वाचणार नसेल, तर मग काय‎करावे?‎ म्हणून मी एक सोपे, लक्षात ठेवण्यासारखे आणि 360‎अंशांत विचार करणारे सूत्र तयार केले आहे. त्याला मी‎TUPEE (टुपी) असे नाव दिले आहे. टुपी हा एक शब्द‎आहे. तो पर्यावरण सुधारण्यासाठी काय करायला हवे,‎याची आठवण करून देतो. TUPEE चा पूर्ण अर्थ असा‎आहे : T म्हणजे ट्रॅव्हल लेस (कमी प्रवास), U म्हणजे‎यूज आयटम्स वाइजली (वस्तूंचा समजूतदारपणे वापर),‎P म्हणजे पर्चेस कॉन्शसली (जाणीवपूर्वक खरेदी), E‎म्हणजे ईट केअरफुली (सजग आहार) आणि दुसरे E‎म्हणजे एलिमिनेट इलेक्ट्रिसिटी वेस्ट (वीज वाया जाणे‎थांबवा). ही पाच क्षेत्रे जीवनातील संपूर्ण कार्बन फूटप्रिंट‎कव्हर करतात. प्रत्येक क्षेत्रातून जागतिक स्तरावर सुमारे‎20 ते 25% कार्बन उत्सर्जन होते. म्हणजेच या पाच गोष्टींत‎सुधारणा केल्यास पर्यावरणीय परिणाम मोठ्या प्रमाणात‎नियंत्रित करू शकतो. सर्वप्रथम टी बद्दल. वाहतूक हे‎जागतिक कार्बन उत्सर्जनातील मोठे कारण आहे. प्रत्येक‎अनावश्यक प्रवास इंधन जाळतो आणि कार्बन वाढवतो.‎यावेळी उन्हाळी सुट्टीत लांबचा प्रवास टाळा. 4-5 जणांचे‎कुटुंब सुट्टीसाठी लांब अंतराचा प्रवास करत असेल तर ते‎साधारण 2-3 झाडे तोडल्याएवढे कार्बन उत्सर्जन करते.‎अशा लाखो प्रवासांचा विचार करा. तसेच छोटी किंवा‎एक-दोन किलोमीटरचे अंतर असल्यास पायी जा किंवा‎सायकल वापरा. दुसरे म्हणजे यू. सिंगल-यूज वस्तूंचा‎वापर टाळा. आपण कपडे, गॅझेट्स, फर्निचर अशा वस्तू‎खूप लवकर बदलतो. या वस्तू तयार करण्यासाठी ऊर्जा,‎पाणी आणि संसाधने लागतात. तिसरे म्हणजे पी. गरज‎आणि इच्छा यातील फरक समजणे हे आजचे सर्वात मोठे‎हवामान पाऊल आहे. प्रत्येक नवीन खरेदीमुळे उत्पादन,‎पॅकेजिंग आणि वाहतूक वाढते. शक्य तितकी नवीन खरेदी‎पुढे ढकला. एक, दोन किंवा सहा महिने उशिरा खरेदी‎करा. चौथे म्हणजे इ. आधुनिक माणसाचे अन्नही‎धोकादायक ठरत आहे. केवळ आपल्या अन्नामुळे‎जगातील सुमारे 25% कार्बन उत्सर्जन होते. स्थानिक‎आणि हंगामी अन्नच खा. फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा‎वापर कमीत कमी करा. पाचवे इ म्हणजे वीज बचत.‎विशेषतः कोळशावर आधारित वीजनिर्मिती हे कार्बन‎उत्सर्जनाचे मोठे कारण आहे. अनावश्यक दिवे, उपकरणे‎बंद ठेवणे, एसीचे तापमान 26 अंशांवर ठेवणे आणि ऊर्जा‎कार्यक्षम 5 स्टार उपकरणे वापरणे — ती किंचित महाग‎असली तरी — हे त्यावरील उपाय आहेत. खरे तर उपाय‎आपल्या दैनंदिन जीवनातच दडलेला आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *