माझ्या प्रवासाच्या दिवसांमध्ये अनेकदा जेव्हा फोनवर बहिणीचे नाव दिसायचे, तेव्हा मी घाबरायचो आणि धावत जाऊन फोन उचलायचो. कारण माझ्या प्रवासादरम्यान बहीणच माझ्या आजारी वडिलांची काळजी घेत असे. ती मुंबईतच राहायची आणि एक गृहिणी होती. जेव्हा तिचा कॉल यायचा तेव्हा तो अशा अनियंत्रित लाटेसारखा असायचा, जी पायाखालची जमीन सरकवून तुम्हाला पाणी आणि वाळूच्या भोवऱ्यात घेऊन जाते. वृद्ध नातेवाइकांची काळजी घेण्याचे हेच वास्तव आहे- आर्थिक निर्णय आणि काळजी घेण्याशी संबंधित संकटांची लाट, जी तुम्हाला सावरण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडते. माझे वडील त्यांची सर्व कामे उत्तम प्रकारे करत असत, पण मग एक दिवस ते करू शकले नाहीत. तेव्हा आम्ही मुला-मुलींनी चोवीस तास आळीपाळीने काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. कौटुंबिक काळजीवाहक आरोग्य सेवा यंत्रणेचा कणा असतात, विशेषतः आपल्यासारख्या देशात. तरीही ही विनामोबदला मेहनत अनेकदा दुर्लक्षित राहते. बहिणीने हॅलो बोलण्यापूर्वीच माझा प्रश्न असायचा की ‘सगळं ठीक आहे ना?’ व ती फक्त ‘हम्म’ म्हणायची तेव्हा मी तिचा थकवा समजून जायचो. मला माहीत आहे की वृद्धांची काळजी घेणे कठीण असते, कारण मी आई-वडिलांसोबत सासऱ्यांचीही काळजी घेतली आहे, ज्यांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले. या कामात धैर्य आणि नम्रता, दोन्ही हवी असते. असेही दिवस असायचे, जेव्हा ओरडावेसे वाटायचे आणि मी ओरडायचोही. अनेकदा अशी कामे करावी लागतात, जी खूप खाजगी असतात- जसे पालकांना आंघोळ घालणे. तुमचे डोळे पाणावतात, कारण तुम्हाला माहीत असते की त्यांना त्या मुलाकडून अशी मदत घेताना लाज वाटत आहे, ज्याला कधीकाळी त्यांनीच आंघोळ घातली होती आणि डायपर घातले होते. मला काळजी घेतानाचा तोच थकवा सोमवारी आठवला, जेव्हा मी किंडलवर बेथ पिंस्कर यांचे पुस्तक ‘माय मदर्स मनी : ए गाइड टु फायनान्शियल केअरगिव्हिंग’ डाउनलोड केले. यामध्ये त्यांनी आजारी आईची काळजी घेण्याचा प्रवास सांगितला आहे. वृद्धांची काळजी घेताना आर्थिक आणि भावनिक गुंतागुंतीतून जाणाऱ्या प्रौढांसाठी हे अत्यंत व्यावहारिक हँडबुक आहे. हे अत्यंत सोप्या पद्धतीने काळजी घेण्याच्या खर्चाचा अंदाज सांगते, ज्यामध्ये दीर्घकालीन खर्चाच्या बजेटिंगचे टेम्पलेटदेखील आहेत. यामुळे मला सासऱ्यांसोबतचा एक अनुभव आठवला, ज्यामध्ये मी त्यांना अशी गोष्ट विचारली, जी कोणत्याही जावयासाठी सोपी नसते. मी म्हणालो, ‘मी तुमच्यासाठी इमर्जन्सी किट तयार करू इच्छितो, जी गरज पडल्यावर तुमच्या कामी येऊ शकेल. मी तुमचे कागदपत्र पाहू शकतो का, काही गोष्टी एकत्र ठेवू शकतो का, सोसायटीच्या कागदपत्रांमधील नॉमिनेशन आणि बँक खात्यांशी संबंधित दस्तऐवज तपासू शकतो का? जेणेकरून तुमच्या मुलांमध्ये स्पष्टता राहील.’ त्यांनी आनंदाने मला पासवर्ड आणि कपाटाच्या चाव्या दिल्या. तेव्हा मी सर्वकाही व्यवस्थित करू शकलो. कारण मी त्या टप्प्यातून गेलो आहे, त्यामुळे मला वाटले की हे पुस्तक अधिक वास्तववादी आहे. निरुपयोगी पुस्तकी तथ्यांऐवजी यात वृद्धांची काळजी घेण्याच्या ‘गुंतागुंतीच्या मानवी अनुभवाला’ कव्हर केले आहे. जर तुम्ही विचाराल की हे पुस्तक कुणी वाचले पाहिजे, तर मी म्हणेन की हे त्या ‘सँडविच जनरेशन’ने वाचले पाहिजे, ज्यांना अचानक आलेल्या आरोग्य संकटांदरम्यान पालकांची जबाबदारीही सांभाळावी लागते आणि ज्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा काम करत आहेत किंवा मग माझ्या मुलांप्रमाणे तिथेच लग्न करून सेटल झाले आहेत. जर तुम्ही 40 किंवा 50 चे वयात आहात आणि तुमचे पालक वयोवृद्ध होत आहेत, तर हे पुस्तक कोणत्याही आणीबाणीच्या घटनेपूर्वी सल्ला घेण्याचे एक अनमोल माध्यम असू शकते. पुस्तकातील ज्या एका ओळीने मला माझ्या म्हातारपणाबद्दल विचार करण्यास भाग पाडले, त्यात लेखिका म्हणतात की त्यांच्या आईकडे 12 नेलकटर होते. मी विचार करू लागलो की जर माझ्याकडे 12 रेझर असले तर माझी मुलगी काय विचार करेल. फंडा हा आहे की जर तुम्ही तुमच्या नातेवाइकांमध्ये किंवा मित्रांमध्ये असा एखादा माणूस पाहिलात, जो आपल्या वृद्धांचा केअरगिव्हर म्हणून दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे, तर तुम्ही किमान त्यांना अशी पुस्तके नक्की द्या. ही पुस्तके त्यांना त्यांचे गुंतागुंतीचे जीवन सहजपणे पार करण्यासाठी मार्गदर्शन करतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel




https://shorturl.fm/cCLXh