व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि या दिवसांत प्रेमी युगूल त्यांच्या प्रियजनांना खास करण्यासाठी प्रत्येक दिवस जसे की रोझ डे आणि प्रपोज डे असे पुर्ण वीक साजरा करतात. तर आज चॉकलेट डे आहे. प्रेम व्यक्त करण्याचा हा सर्वात गोड प्रसंग आहे. या दिवशी प्रत्येक जोडीदार एकमेकांना चॉकलेट भेट देतात. पण आजकाल अनेकजण हे आता महागड्या आणि दिखाऊ वस्तूंपेक्षा स्वत:च्या हाताने बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देतात.
तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला या चॉकलेट डे ला हाताने बनवलेला गोड पदार्थ भेट म्हणून देणार असाल, तर तो साजरा करण्यासाठी उत्तराखंडमधील बागेश्वर येथील प्रसिद्ध ब्राऊन बर्फी हे सर्वोत्तम ठरेल. ही हाताने बनवलेली चविष्ट ब्रर्फी खाल्ल्यानंतर तुमच्या प्रिय व्यक्तीला एकदम खास वाटेल.
बागेश्वरची प्रसिद्ध ब्राऊन बर्फी अगदी चॉकलेटसारखी दिसते, चव इतकी अस्सल आणि वास इतका स्वादिष्ट आहे की फक्त एक बाइट खाल्ल्याने तुमच्या जोडीदाराचे मन आनंदित होईल. चला तर मग या चॉकलेट डे ला बागेश्वरची प्रसिद्ध ब्राऊन बर्फी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
बागेश्वरची ब्राऊन बर्फी का खास आहे?
बागेश्वरच्या ब्राऊन बर्फीची खासियत म्हणजे त्याला ना महागड्या चॉकलेटची गरज भासत ना कोणती मोठी प्रोसेस. फक्त आपलं घरगुती शुद्ध तूप, गूळ आणि खवा यांच्या साहाय्याने ही बर्फी बनवली जाते. प्रेमाच्या आठवड्यात ही रेसिपी तुमच्या प्रेमाला एक ट्विस्ट देईल.
ही बर्फी बाहेरून गडद ब्राऊन रंगाची आणि आतून मऊ दिसते. गुळाचा गोडवा आणि तुपाचा सुगंध याला सामान्य बर्फींपेक्षा वेगळी आणि खास बनवते. ही बर्फी उत्तराखंडमध्ये अनेकदा सण आणि खास प्रसंगी बनवली जाते आणि आता तुम्ही ती घरी सहज बनवू शकता.
साहित्य
1 कप खवा (मावा)
½ कप गूळाची पावडर
2 टेबलस्पून घरगुती तूप
2 चमचे कोको पावडर
½ टीस्पून वेलची पावडर
2 टेबलस्पून बारीक चिरलेले काजू आणि बदाम
ब्राऊन बर्फी कशी बनवायची
सर्वप्रथम, एका जाड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करा.
आता त्यात खवा टाका आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा आणि हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.
आता खव्यात गूळाची पूड टाका आणि गूळ वितळेपर्यंत आणि खव्यात पूर्णपणे मिसळेपर्यंत चांगले मिक्स करा.
गूळ आणि खव्याच्या मिश्रणात कोको पावडर टाका आणि आच कमी ठेवा, जेणेकरून त्याची चव कडू होणार नाही.
यानंतर यावर वेलची पावडर आणि सुकामेवा टाका व हे मिश्रण चांगले मिक्स करा.
जेव्हा मिश्रण पॅनला चिकटणार नाही व पूर्णपणे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा.
त्यानंतर एका प्लेटला थोडे तुप लावा, मिश्रण प्लेटमध्ये काढून पसरवा.
थोडावेळ हे मिश्रण थंड होऊ द्या, थंड झाल्यावर तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारात कापा.
ब्राऊन बर्फीचे काप केल्यावर त्यावर थोडी कोको पावडर टाका.
व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुम्ही हे तुमच्या खास व्यक्तीला तुमच्या जोडीदाराला ही खास तुमच्या स्वत:च्या हातांनी बनवलेली ब्रर्फी खायला द्या तेव्हा त्याची चव आणि प्रेम हे मिश्रण त्यांना भावनिक करेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




