
Mira Road Crime : मिरा रोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे.
सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन, घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य जप्त केले आहेत. मनोज साने असं या 56 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
लिव्ह-इन पार्टनरला आधी मारलं, मग...
मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यात मनोज साने (वय 56) आणि मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघं राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं.
पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले.
हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर जे धक्कादायक चित्र समोर आलं ते पाहुन सर्वांनाच धक्का बसला. सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
























Subscribe to my channel




