बीड भूसंपादन घोटाळा: माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा अन्न-त्याग; प्रकृतीबाबत चिंता

Beed Land Acquisition Scam: Former Collector Avinash Pathak Refuses Food and Water Amid Legal Action बीड: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आता नाट्यमय वळण समोर आले आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयितांपैकी एक असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पोलीस कोठडीत असताना अन्न आणि पाणी घेण्यास नकार दिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग २११ च्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या नावाखाली बोगस लाभार्थी उभे करून कोट्यवधी रुपये हडप केल्याचा आरोप पाठक यांच्यावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कोठडीत गेल्यासून काहीही खाल्लेले नाही किंवा साधे पाणीही प्यायलेले नाही.

पाठक यांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांनी चौकशीला सहकार्य करण्याऐवजी अशा प्रकारे उपोषण सुरू केल्याने तपासात अडथळे येत असल्याची चर्चा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यात आणखी काही बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने केला जात आहे. पाठक यांनी अन्न-पाणी सोडल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात हलवावे लागण्याची शक्यता आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *