गिरिडीह (झारखंड): रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाणे किती जीवावर बेतू शकते, याची एक भीषण घटना झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात समोर आली आहे. येथे पाणीपुरी आणि चाट खाल्ल्यामुळे तब्बल १८ हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून, यामध्ये एका ७ वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीह येथील बाजतो गावात एका फिरत्या विक्रेत्याकडून अनेक मुलांनी आणि काही ज्येष्ठांनी पाणीपुरी आणि छोले-चाट खाल्ले होते. हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. रंजन कुमार या ७ वर्षांच्या मुलाची प्रकृती अधिक बिघडली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
प्रशासनाची धावपळ:
एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले. गिरिडीहचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन बाधितांची विचारपूस केली. सध्या १८ मुलांवर आणि दोन प्रौढांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
विषबाधेचे कारण काय?
प्राथमिक अंदाजानुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीपुरीसाठी वापरलेले पाणी दूषित असण्याची किंवा विक्रेत्याने अनेक दिवसांचे शिळे अन्न वापरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने अन्नाचे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतही अशीच घटना:
याच दरम्यान, मुंबईतूनही अशीच एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुली अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील उघड्यावरचे आणि विशेषतः पाणी साठवलेले पदार्थ खाताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




