ठाणे:
ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा एक धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. ठाण्यातील महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये चक्क गुजराती माध्यमाच्या शिक्षकांकडून अध्यापन केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल भोर यांनी पुराव्यासह हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेच्या काही शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याऐवजी किंवा तिथे मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याऐवजी, पालिकेने गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना या वर्गांवर शिकवण्यासाठी पाठवले आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यात यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.
माजी नगरसेवक अनिल भोर आक्रमक:
अनिल भोर यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी समजणारे शिक्षक असायला हवेत. मात्र, पालिकेच्या शिक्षण विभागाने गुजराती माध्यमाच्या शिक्षकांना तिथे नेमले आहे. ज्या शिक्षकांना स्वतःला मराठी नीट बोलता किंवा लिहिता येत नाही, ते मराठी विद्यार्थ्यांना काय शिकवणार? हा मराठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ आहे."
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण:
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांनीही प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाची भूमिका:
हा प्रकार समोर आल्यानंतर आता शिक्षण विभाग काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिल भोर यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करून मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहर
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
महाराष्ट्र
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ





















Subscribe to my channel




