मुंबई:
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अन्नू कपूर सध्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आहेत. एका ताज्या मुलाखतीत त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ओम पुरी यांनी अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूर हिच्याशी लग्न केले होते, मात्र हे नाते अत्यंत वेदनादायी ठरल्याचे अन्नू कपूर यांनी रडत-रडत सांगितले.
नेमका प्रकार काय?
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, "ओम पुरी हे एक महान कलाकार होते, यात शंका नाही. पण एक पती म्हणून त्यांनी माझ्या बहिणीला मोठा धोका दिला. ज्या काळात माझी बहीण गरोदर होती, त्याच वेळी त्यांनी तिला सोडून नंदिता नावाच्या दुसऱ्या महिलेशी लग्न केले. हा विश्वासघात माझ्या बहिणीच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ठरली."
१५ तासांचा तो थरार आणि बहिणीची ओढाताण:
अन्नू कपूर यांनी सांगितले की, ओम पुरींचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे समजताच सीमा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेक वर्षांनंतर जेव्हा ओम पुरींची प्रकृती खालावली आणि त्यांचे शरीर साथ देईनासे झाले, तेव्हा ते पुन्हा सीमा कपूर यांच्याकडे परतले. अन्नू कपूर म्हणतात, "जेव्हा त्यांना कोणाचाच आधार उरला नाही, तेव्हा ते माझ्या बहिणीकडे आले. मला माझ्या बहिणीचाही राग आला होता की तिने त्यांना पुन्हा का स्वीकारले? पण तिने मोठ्या मनाने त्यांची शेवटपर्यंत सेवा केली."
अन्नू कपूर यांचा संताप:
"ओम पुरी मला खूप घाबरत असत, कारण मी नेहमीच स्पष्ट बोलतो. माझी बहीण आज निराधार आहे, तिला कोणाचाही आधार नाही, हे पाहून आजही माझे मन तिळतिळ तुटते," असे म्हणताना अन्नू कपूर भावूक झाले. सीमा कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ओम पुरींच्या या वागण्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता आणि त्या काळात त्यांना त्यांचे बाळही गमवावे लागले होते.
आज ओम पुरी आपल्यात नसले तरी, त्यांच्या वागण्यामुळे आपल्या बहिणीच्या वाट्याला आलेल्या दुःखाची खंत अन्नू कपूर यांनी या मुलाखतीतून व्यक्त केली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel





https://shorturl.fm/ZMFpC