भारतातील स्नॅक्स उद्योगातील आघाडीची कंपनी बिकाजी फूड इंटरनॅशनल चे CMD शिव रतन अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबासोबत चेन्नई येथे गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली असून अनेक व्यावसायिक, उद्योजक आणि कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईत उपचारासाठी असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने अग्रवाल कुटुंबासह व्यावसायिक क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे.
शिवरतन अग्रवाल हे भारतीय स्नॅक्स उद्योगातील एक महत्त्वाचे नाव होते. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत बीकाजी या ब्रँडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भुजिया, नमकीन आणि इतर पारंपरिक भारतीय पदार्थांना आधुनिक पॅकेजिंग आणि मार्केटिंगद्वारे नवीन ओळख मिळवून दिली. आज बीकाजी हा ब्रँड देशभरातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.
त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे कंपनीने झपाट्याने प्रगती साधली. नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश, उत्पादनांची विविधता आणि गुणवत्तेवर दिलेला भर यामुळे बीकाजीने ग्राहकांचा विश्वास जिंकला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच कंपनीने स्पर्धात्मक बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर उद्योगविश्वातील अनेक मान्यवरांकडून शोकसंदेश येत आहेत. कंपनीच्या पुढील वाटचालीबाबतही आता चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शून्यातून उभं केलेलं साम्राज्य मागे ठेवून जाणाऱ्या या दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाच्या निधनाने भारतीय उद्योगविश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




