
Pune : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अत्यंत शांत, संयमी आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभार यांच्या जाण्याने पोलीस दलासह सर्वसामान्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी सध्या शिक्षण घेत आहेत. सिद्धी ही बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत असून वडिलांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत कुंभार पोलीस ठाण्यात आपली ड्युटी चोख पार पाडून वडगावशेरी येथील घरी परतले होते. मात्र, मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते.
|
|
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे नियोजन त्यांनी सलग दोन वर्षे अतिशय सुरक्षितपणे हाताळले होते. नुकतेच २५ ते २७ जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता. योगायोगाने याच काळात वाघोलीत दोन खुनाच्या घटना घडल्या, मात्र दबावाखाली न येता कुंभार यांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखली. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५ मध्ये त्यांना 'सुरक्षित पुणे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शहर
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
- लेकरांना कवेत घेताच बंदिस्त आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रंगला भावूक 'गळाभेट' सोहळा!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: संगमेश्वरात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
गुन्हा
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.


























Subscribe to my channel



1 thought on “Pune : पुणे पोलीस दलात शोककळा; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मध्यरात्री निधन”