
Nashik : राज्यासह देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पण नाशिक जिल्ह्यातील मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या आनंदाला गालबोट लागलं आहे. पोलीस परेड मैदानापासून अवघ्या २५० मीटरवर फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस आणि प्रशासनानं घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
पोलीस परेड मैदानापासून हाकेच्या अंतरावर फुगे विक्रेता उभा होता. त्याच्याकडे असलेल्या नायट्रोजन सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना उपचारांसाठी नाशिकला पाठवण्यात आलं आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलं, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
|
|
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं फुगे घेण्यासाठी काही जण विक्रेत्याजवळ थांबले होते. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव, उज्ज्वला महाजन जखमी झाले. सकाळी पोलीस परेड मैदानात राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा कार्यक्रम सुरु होता. या सोहळ्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शाळकरी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक हजर होते. त्याच सुमारास मैदानाजवळ एक फुगेवाला नायट्रोजन गॅसचे फुगे फुगवून विकत होता. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी बाहेर पडलेली मुलं आणि कुटुंब विक्रेत्याकडून फुगे विकत होतं. त्याच सुमारास स्फोट झाला.
स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि परिसरात खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याची चर्चा सुरु झाली. तशा अफवा पसरल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे.
फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किंवा अतिरिक्त दबावामुळे स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर वर्तवली. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel





Start sharing, start earning—become our affiliate today!