कॅन्सरग्रस्त एका तरुणाने घर आणि रुग्णालयात अनेक महिने घालवल्यानंतर एके दिवशी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो एका म्युझिक स्टोअरवर सीडी खरेदीसाठी थांबला आणि तेथील सेल्सगर्ल त्याला आवडली. त्याला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम जडले. तो काउंटरपर्यंत गेला तेव्हा सेल्सगर्लने हसून विचारले - ‘मी आपली काही मदत करू शकते का?’ बऱ्याच काळापासून गंभीर चेहरे पाहणाऱ्या त्या तरुणासाठी हे आतापर्यंतचे सर्वात सुंदर हास्य होते. तो म्हणाला - ‘अं... मला एक सीडी घ्यायची आहे.’ त्याला जी पहिली सीडी दिसली, ती त्याने उचलली आणि पैसे दिले. मुलगी हसून म्हणाली, ‘मी हे गिफ्ट रॅप करून देऊ का?’ मुलाने होकार दिला आणि ती ते रॅप करण्यासाठी मागच्या खोलीत गेली. मुलगा ती रॅप केलेली सीडी घेऊन घरी गेला. तेव्हापासून पुढील काही दिवस तो नियमितपणे त्याच म्युझिक स्टोअरवर जात असे आणि दररोज एक सीडी खरेदी करत असे. दररोज ती मुलगी त्या सीडी गिफ्ट रॅप करून देत असे आणि मुलगा त्या सीडी न उघडताच आपल्या कपाटात ठेवत असे. मुलगा अत्यंत लाजाळू होता. त्याने खूप प्रयत्न केले, पण मुलीला बाहेर फिरायला जाण्याबद्दल विचारण्याची हिंमत तो एकवटू शकला नाही. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला धीर दिला. दुसऱ्या दिवशी तो पक्का निश्चय करून स्टोअरवर पोहोचला. नेहमीप्रमाणे एक सीडी खरेदी केली आणि जेव्हा ती मुलगी दुसऱ्या ग्राहकाला अटेंड करत होती, तेव्हा तो आपला फोन नंबर तिथे सोडून निघून गेला. पुढील दोन दिवस तो स्टोअरवर गेला नाही, म्हणून मुलीने त्याला फोन केला. आईने फोन उचलला आणि विचार करू लागली की हे कोण असू शकते. ही तीच म्युझिक स्टोअरवाली मुलगी होती. तिने मुलाशी बोलणे करून देण्यास सांगितले तेव्हा आईला रडू कोसळले. मुलीने विचारले, काय झाले? आई म्हणाली, ‘तुला माहीत नाही? तो तर कालच वारला.’ फोनवर दीर्घ शांतता पसरली. त्याच दुपारी आईने त्याचे कपाट उघडले आणि तेथे गिफ्ट-पेपरमध्ये गुंडाळलेल्या खूप साऱ्या सीडी पाहून त्या थक्क झाल्या. तिथे खूप साऱ्या सीडी असल्याने आईला उत्सुकता वाटली व त्यांनी नुकतीच आणलेली एक सीडी उघडली. पाकीट फाडताच त्यांना एक चिट्ठी दिसली, ज्यावर लिहिले होते - ‘हाय, तू खूप क्यूट आहेस. मला तुला भेटायला आवडेल. कधीतरी बाहेर जाऊया? - सोफी.’ हे पाहून आईला अनावर रडू फुटले. गुरुवारी रात्री एक मोठी चूक केल्यानंतर मला ही गोष्ट आठवली. मी मुंबईला जाणाऱ्या ट्रेनऐवजी पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढलो होतो. दोन्ही गाड्या अमरावतीहूनच सुटतात. मी काही विचार करणार, त्याआधीच मी पाहिले की आणखी दोन लोकांनीही हीच चूक केली होती. आता ते कधी रेल्वे अनाउन्समेंट सिस्टिमला दोष देत होते, तर कधी साखळी ओढण्याची धमकी देत होते. जेव्हा ते टीसीसोबत भांडत होते, तेव्हा मुंबईला जाणारी ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरून आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली, कारण ती पुण्याच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगवान होती. मी हेड टीसीबद्दल माहिती घेण्यासाठी बेडरोल सुपरवायझरची मदत घेण्याचे ठरवले व माझ्या चुकीबद्दल त्यांची माफी मागितली. हेड टीसीसाठी मी त्या प्रवाशांपेक्षा चांगला होतो, जे कडवट आणि मोठ्या आवाजात तक्रार करत होते. त्यांनी तत्काळ मागून येणाऱ्या ट्रेनच्या प्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची व्यवस्था केली. आम्ही सर्व मनमाड स्टेशनवर उतरलो, पण सीट फक्त मला एकालाच मिळू शकली. ते दोघे पुन्हा तक्रार करू लागले की मला सीट का मिळाली व त्यांना का नाही. तेव्हा टीसी म्हणाले, ‘तुम्ही आधी विचारले असते तर मी तुम्हाला दिली असती...’ फंडा हा आहे की, आयुष्यात कोणतीही विचित्र परिस्थिती उद्भवली तर, ‘एकदा विचारले असते तर बरे झाले असते’, असा पश्चात्ताप करण्यापेक्षा तत्काळ विचारणे कधीही श्रेयस्कर.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




