पुणे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती आणि बदल्या विभागांतर्गत करण्याचा तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेतले. त्यामुळे काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रांत आणि तहसील कार्यालयातील रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.
महसूल विभागातील वरिष्ठ लिपिक आणि मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. पदोन्नती मिळालेल्या नायब तहसीलदार संवर्गाची राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी एकत्रित करण्यात यावी. तसेच महसूल सहाय्यक पदांची भरती करण्यात यावी. राज्य सरकारने रिक्त पदांची भरती न केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे सरकारने रिक्त पदे तत्काळ भरावीत.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच वाहन चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश जारी करावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
नायब तहसीलदार संवर्गाच्या पदोन्नती व बदल्या विभागांतर्गत करण्याबाबत आदेश झाले आहेत. यासह इतर मागण्यांबाबतही काही दिवसांमध्ये अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. रिक्त पदांबाबत जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा हा मोठा विजय आहे.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


