
Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कार्यालयात आज पुणे गुन्हे शाखेचे पथक गेले. या पथकाकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे काही गोष्टींची विचारणा करण्यात आली. पोलिसांनी यावेळी काही कादगपत्रे देखील तपासली. यानंतर काही वेळाने हे पथक निघून गेलं. पण पुणे पोलीस अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयात घुसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रचाराचा वेळ संपल्यानंतर अचानक अशाप्रकारे पोलीस कार्यालयात गेल्याने त्याचा नेमका अर्थ काय पकडायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या प्रकरणावर नरेश अरोरा यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
"आज संध्याकाळी आमच्या डिझाईन बॉक्सच्या पुणे शाखेवर क्राईम ब्रांच येथून काही जण आले होते. मी ऑफिसमध्ये नव्हतो. तसेच आमचे सिनियरही ऑफिसमध्ये नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी ऑफिसमध्ये होते त्यांना त्यांची विचारले की, इथे काय काम होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय काम होतं? याबाबत त्यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जितकी माहिती होती तितकी माहिती दिली", असं नरेश अरोरा यांनी सांगितलं.
|
|
"त्यानंतर त्यांनी काही दस्तावेज मागितले, ते दस्तावेज दाखवण्याची मागणी केली. काही नंबर मागितले. आमचे कर्मचारी म्हणाले की, आमच्या ऑफिसमध्ये आमचे वरिष्ठ नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ही माहिती अशी देऊ शकत नाहीत. त्यानंतर आमचे कर्मचारी संदीप यांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. आपण कोण आहात, कुठून आला आहात? आपला परिचय द्या, असं आमच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यावर त्यांनी आपण क्राईम ब्रांच इथून आल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आमचे सीईओ आणि सिनियर मॅनेजर अमन सर यांचं नाव आणि फोन नंबर विचारला. जेव्हा आमच्या कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत बातचित करुन देऊ का? असं विचारलं तेव्हा त्यांनी नकार दिला", अशी माहिती नरेश अरोरा यांन दिली.
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरु होती. आम्ही त्या ठिकाणी बिझी होतो. त्यानंतर आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली की, त्यांना एक तक्रार मिळाली होती. त्यामुळे ते आमच्या कार्यालयात आले होते. त्यांनी जो नंबर दिला होता त्यावर आम्ही फोन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण फोन उचलण्यात आला नाही. पक्षाकडूनही उच्च अधिकाऱ्यांसोबत बातचित करण्याचा आली आहे. पण त्यामधूनही नेमकं काय प्रकरण आहे ते समोर आलेलं नाही. आमच्या संस्थेने त्यांना सहकार्य केलं आहे. याआधी सहकार्य हवं असेल तर आम्ही सहकार्य करु", अशी प्रतिक्रिया नरेश अरोरा यांनी दिली.
"राष्ट्रवादी काँग्रेससाठी आम्ही काम करतोय हे सर्वांना माहिती आहे. आम्ही पूर्ण विधानसभा निवडणुकीत काम केलं. हे आमच्यासोबत पहिल्यांदा घडलेलं नाही. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे. याआधीदेखील आम्ही या गोष्टीला झेललं आहे. जी सरकारी संस्था आहे तिला आमचं सहकार्य असेल. कारण आम्ही जे काम करतो लोकांसमोर आहे", अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण
दरम्यान, पुणे पोलिसांकडूनदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी एक अधिकारी आणि दोन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये काहीही अनुचित आढळले नाही. त्यानंतर ते पथक तिथून ताबडतोब निघून गेले. तिथे काहीही अनुचित आढळले नाही", असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel



1 thought on “Pune : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलिसांची एंट्री; नेमकं काय घडलं? नरेश अरोरा माध्यमांसमोर”