Pune : पुणे पोलिसांची शितल तेजवानीच्या घरावर झाडाझडती; महत्त्वाची कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

Pune : पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घराची झाडाझडती घेतली. सध्या शीतल पोलीस कोठडीत आहे. यादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजवानीच्या घराची झाडाझडती घेतली. मागील १ तासापासून तेजवानीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. कागदपत्रांची पाहणी आणि तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सुद्धा जप्त केली जाण्याची शक्यता आहे.

शितल तेजवानीच्या घरातून पोलिसांना मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच ३०० कोटींपैकी काही रक्कम जप्त करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरावर धाड टाकली. शीतल तेजवानी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पुणे पोलिसांना आहे.

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत! रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण; धक्कादायक VIDEO व्हायरल

मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवाणी याआधी दोन वेळा चौकशी केली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *