Pune : हाताला लावलेला पार्टी बँड, गाडीतून उतरताना पाय अडकला… टायर निखळलं तरीही पुण्यात मद्यधुंद चालकाचा धक्कादायक ‘कार’नामा; VIDEO

Pune : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं आणि अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, पण शहरात रोज नवीनवीन गुन्हे घडताना दिसत आहे. असाच एक संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील कॅम्प परिसरात एक बेधुंद कारचालकाचा थरार पाहायला मिळाला आहे. त्याच्या ताब्यात असलेली किया या कंपनीची कार चालवत असताना गाडीचा टायर निघालं असताना देखील कार भरधाव वेगात गाडी चालवत जीवाशी खेळ करताना पाहायला मिळालं आहे.

Pune : सिंहगड रोडवर वाहतूक कोंडीची शक्यता; मेट्रो कामासाठी उड्डाणपुलाचे ६६ ठिकाणी तोडकाम, पुलाची रुंदीही कमी होणार



धाडसी युवक सत्यजित सरवदे यांनी गाडीचा पाठलाग करत ती गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसांना माहिती देऊन ती गाडी थांबवली अन् लोकांचे जीव वाचवले. नाकाबंदी सुरु असताना हा सर्व प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. सदर व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगरपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत हा मद्यधुंद चालक आपली कार चालवत होता. संबंधित चालकाच्या हातावर पार्टीचा बँड देखील दिसत होता. बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. गाडीचा टायर निघालेला असताना देखील चालक कार पळवत होता, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *