
Pune : महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदारयादी केल्यानंतर आता त्यातील मतदारांची पळवापळवी समोर येण्यास सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. एका प्रभागातील शेकडोंच्या संख्येने मतदार अन्य प्रभागांत टाकण्यात आले आहेत. यामध्ये भौगोलिक हद्दीचे पालन झाले नाही. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अनेक गंभीर त्रुटी समोर आणल्या असून, प्रशासनाच्या कामावर आक्षेप घेतले जात आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मतदारयादीची प्रत मिळावी यासाठी निवडणूक शाखेकडे पैसे भरण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दुपारपासून मतदान केंद्रनिहाय मतदारांची नावे तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक गडबडी केल्याचे समोर येत आहे.
|
Pune : पुणे महापालिकेच्या मेट्रो नियमांची पीएमआरडीएत अंमलबजावणी का नाही? बांधकाम व्यावसायिकांचा सवाल |
१. प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी या प्रभागातील मतदार टाकण्यात आले आहेत. यामध्ये डायस प्लॉट, सेना दत्त पेठ, पानमळा, चैत्रबन सोसायटी येथील शेकडो मतदारांचा समावेश आहे. तर याच प्रभागातील रम्य नगरी, प्रेम नगर सोसायटी, गुरुराज सोसायटीचा काही भाग, सातारा रस्त्यावरील काही सोसायट्या असा मोठा भाग अन्य प्रभागाला जोडण्यात आल्या आहेत. अजूनपर्यंत पूर्ण मतदारयादी तपासून झालेली नाही. त्यामुळे यात अजून मोठा घोळ समोर येण्याची शक्यता असल्याचे उमेदवारांकडून सांगितले जात आहे.
२. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर पद्मावती येथील शाहू कॉलेज, पर्वती पोलिस ठाणे, पंचमी हॉटेल या भागातील मतदार प्रभाग क्रमांक २८ नवी पेठ-पर्वती या प्रभागामध्ये गेले आहेत. हक्काचा मतदार अन्य प्रभागात गेल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे.
३. प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी लोहगाव उर्वरित आणि प्रभाग क्रमांक तीन विमाननगर लोहगाव या दोन्ही प्रभागांमधील मतदार एकमेकांमध्ये टाकण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक सात गोखलेनगर-वाडकेवाडीमधील अनेक याद्या या थेट प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी या प्रभागात टाकण्यात आल्या आहेत.
४. यादी क्रमांक १३५ आणि १५३ या दोन याद्यातील यामध्ये जवाहरनगर, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सिंचननगर, सायली सोसायटी येथील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. अन्य याद्यांमधूनही मतदारांची पळवापळवी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे शहरात माणिकबाग, वारजे, कर्वेनगर, मध्यवर्ती पेठांमधील प्रभाग, हडपसर येथेही मोठ्या गडबडी झालेल्या आहेत. महापालिकेने मतदार याद्या फोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, असा दावा केला गेला होता. प्रारूप मतदारयाद्या तयार करताना आरोग्य निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांवर राजकीय प्रभाव टा कून मतदारांची पळवापळवी होत असल्याचा आरोप केला होता. काही प्रभागांबाबत थेट तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यानंतरही असे प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कामावर इच्छुक उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




