
KDMC Election : निवडणुकीच्या तोंडावरच श्रीकांत शिंदे यांना होमपिचवर मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीमधील श्रीकांत शिंदेंच्या विश्वासू नेत्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाने आणि सूनेने आज भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी पक्ष प्रवेश झाला. यावेळी कल्याण-डोंबिवलीमधील अनेक शिवसैनिकांनी भाजपचे कमळ हातात घेतली. या पक्ष प्रवेश सोहळ्याला रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय अनेक स्थानिक भाजप नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीआधी हा शिंदेंना सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमूख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतले.
|
Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती!गुरुवारी २४ तास बंद राहणार, या भागांना होणार परिणाम |
काही दिवसात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी भाजपकडून जोरदार तयारी कऱण्यात येत आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनमोल म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. म्हात्रे यांच्यामुळे भाजपची कल्याणमधील ताकद आणखी वाढली आहे. जानेवारी २०२६ च्या आधी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे भाजपकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. ऑपरेशन लोटस अंतर्गत आता शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय धुरळा आणि धामधूम दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, मनसे अशा प्रमूख पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी दस्तुरखुद्द भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिका निवडणुकीतील आपली जागा अबाधित ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. डोंबिवलीतील शिवसेनेतील (शिंदे गट) अनमोल म्हात्रे यांनी सपत्नीक आणि अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की दिवंगत वामन म्हात्रे यांचे आणि आपले जुने ऋणानुबंध होते.या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ही गोष्ट अशक्य नाही असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."





























Subscribe to my channel




