
Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना यांच्याविरोधात निकाल देत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने सुनावणीदरम्यान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. यामध्ये नागरिकांवर गोळीबार करणे याचा समावेश आहे. शेख हसीना यांनी आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांना मारण्यासाठी प्राणघातक शस्त्रे आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले होते. आंदोलकांवर हल्ले शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आदेशावरून करण्यात आले होते. शेख हसीना यांना ३ कारणांवरून दोषी ठरवण्यात आले. नागरिकांना भडकवणे, हत्येचे आदेश देणे आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अयशस्वी होणे या ३ कारणांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
|
Pune : नवले पुल परिसरात पुन्हा अपघात; सलग ४–५ गाड्या एकमेकांवर धडकल्या |
पहिल्या आरोपामध्ये शेख हसीना परिस्थिती हाताळण्याची आणि हिंसाचार रोखण्याची जबाबदारी पाडण्यात अयशस्वी ठरल्या. या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक हे देखील दोषी असू शकतात हे देखील पुराव्यांवरून दिसून आले. न्यायालयाने अहवाल दिला की, १९ जुलैनंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक बैठका झाल्या. ज्यामध्ये विद्यार्थी आंदोलन दडपण्याचे निर्देश देण्यात आले. शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी कोअर कमिटीला आदेश दिले होते.
याप्रकरणात न्यायालयाने एकूण ५४ साक्षीदारांचे म्हणणे ऐकले. देशभरातून गोळा केलेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेले अतिरिक्त पुरावे देखील तपासण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला की शेख हसनी आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरूनच मानवतेविरुद्ध गुन्हे करण्यात आले होते. त्यामुळे कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली. बांगलादेशच्या माजी गृहमंत्र्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावली. तर पोलिस महासंचालकांना ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. सध्या शेख हसीना आणि माजी गृहमंत्री हे भारतामध्ये आहेत. तर पोलिस महासंचालक तुरूंगात आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



