Pune : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

Pune : सोलापूर जिल्ह्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पुण्याहून नांदेडसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, त्यासाठीचा सर्व्हे नुकताच पार करण्यात आला. या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्ह्यात थांबा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्हातील कुर्डूवाडी जंक्शनला थांबा मिळणार आहे. पुणे-नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व्हेक्षण झाले अशून डिसेंबर अखेर अथवा जानेवारी २०२६ मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची शक्यता रेल्वे विभातील सूत्रांनी सकाळला दिली आहे. 

पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या गाडीला कुर्डूवाडीमध्ये थांबा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी सुविधा तयार होणार आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सोय होणार आहे. सोलापूर आणि मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कुर्डूवाडी येथे थांबते. पण सोलापूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता कुर्डूवाडीत येते तर मुंबईहून सोलापूरला निघणारी वंदे भारत रात्री ९ च्या आसपास कुर्डूवाडीमध्ये येते. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस नाही. जर पुण्याहून दुपारच्या वेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर याचा फायदा होईल, असे स्थानिकांनी सांगितलेय.

Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे–अबु धाबी थेट विमानसेवा सुरू; जाणून घ्या सुरूवातीची तारीख आणि संपूर्ण वेळापत्रक

पुणे ते नांदेड हे ५५० किमीचे अंतर पार करण्यासाठी सध्या १० ते १२ तासांचा प्रवास करावा लागतो. पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास हे अंतर फक्त सहा ते सात तासात पार होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची चाचपणीही पूर्ण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास मराठवाड्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे. त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. बार्शी, माढा, पंढरपूर, करमाळा या भागातून प्रवास करणाऱ्यांना ही वंदे भारत एक्सप्रेस फायद्याची ठरेल. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास कुर्डूवाडी, बार्शी या भागात राहाणाऱ्यांना नांदेडला जाण्याचीही सोय होणार आहे.

पुणे आणि नांदेड वंदे भारत एक्सप्रेसल मर्यादीत थांबे देण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड याच स्थानकावर ही वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट १२०० ते २५०० या दरम्यान असण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

  1. Unlock the excitement of Miami’s party bus rentals, featuring affordable options for any occasion. Discover diverse party bus services in Miami, FL, providing convenient and stylish transportation solutions for your event.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *