Pune : एनआयएची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटींची फसवणूक!

Pune :  पहलगाम हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तुमची चौकशी करण्यात येणार असल्याची भीती दाखवून कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर चोरट्याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकास २३ सप्टेंबरला संपर्क साधून एनआयए अधिकारी असल्याची बतावणी केली. 'पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील दहशतवाद्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे,' अशी भीती चोरट्याने त्यांना दाखविली. या प्रकरणात खात्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्याने सर्व रक्कम आमच्या खात्यात तातडीने जमा करावी लागेल, असे सांगितले.

त्यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या खात्यात वेगवेगळ्या बँकांत ठेवलेले एक कोटी ४४ लाख ६० हजार रुपये पाठविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *