
Mumbai : मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून ४०० किलोच्या आरडीएक्सच्या स्फोटाद्वारे मुंबई शहर हादरवले जाईल, असे या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले आहे. १४ पाकिस्तानी भारतामध्ये घुसल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. ४०० किलो आरडीएक्सने आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामध्ये १ कोटी लोकांचा मृत्यू होईल असा दावा देखील करण्यात आला आहे. ३४ गाड्यांमध्ये आत्मघाती बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली.
धमकीच्या मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की 'लष्कर-ए-जिहादी' म्हणून ओळख असलेल्या एका गटाने या धमकीची जबाबदारी स्वीकारली आहे. १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच भारतात घुसले आहेत असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत आणि राज्यभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व बाजूने तपास केला जात आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका ४३ वर्षीय व्यक्तीला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश मधुकर रणपिसे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पोलिस हेल्पलाइनवर फोन करून कळवा रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. नंतर पोलिसांनी याचा तपास करत आरोपीला अटक केली आणि हा धमकीचा फोन खोटा असल्याचे सांगितले.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


