
Jalna : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सगळीकडून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही यासंदर्भात विरोध दर्शवत आहेत. अशातच त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील यावरून सरकारला थेट सवाल केला आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 'हे मराठी राज्य आहे. इथे मराठीचीच जास्त सक्ती पाहिजे. ती भाषा सगळ्यांसाठी यायला पाहिजे. एक प्रकारे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पण मराठीचं काय? देशभरात मराठीची सक्ती करणार आहेत का? ती पण करायला हवी मग. या राज्यांत ज्यांना मराठी येत नाही, त्यांना मराठी आली पाहिजे. त्यांच्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे. ही गोष्टही खूप महत्त्वाची आहे. अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु, त्याहीपेक्षा आमचा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्याच प्रश्नावर आमचा जास्त फोकस आहे. ते झाल्यावर बाकीच्या प्रश्नांकडे बघू,' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
|
|
'सरकार काय करत आहे, हे आम्हाला माहिती नाही. पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. आरक्षण ओबीसीतून घेणार आणि समाजाला मिळवूनही देणार. मी आणि माझा समाज एकही पाऊल मागे सरकणार नाही. मराठ्यांची काय लाट असते, ते २९ ऑगस्टला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला कळेल, मराठे काय चीज असतात. आता आम्ही मुंबई सोडत नाही. मराठा आरक्षण १०० टक्के घेतल्याशिवाय माझ्यासकट एकही मराठी माघारी फिरणार नाही. तुमची मुंबई बंद पडेल की, सुरू राहील, ते आम्हाला माहिती नाही. परंतु, आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार,' असा एल्गार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



