Maharashtra : आंघोळ करताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट अन् ब्लॅकमेल, तरूणीच्या मित्रानेच असं का केलं?

Maharashtra : विद्यार्थीचा आंघोळीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना नागपुरातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या धमक्यांना कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नागपुरातील सदर पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थीनी आंघोळ करत होती. आंघोळीदरम्यानचा आक्षेपार्ह व्हिडिओ आरोपीने शूट केला. नंतर या व्हिडिओचा वापर करून तो पीडितेला ब्लॅकमेल करत होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याच त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलीस ठाणे गाठले.

Navi Mumbai : धनदांडग्याच्या मुलीने कारने स्कुटी उडवली, महिलेनं जागेवरच जीव सोडला, १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला बेड्या

पोलीस ठाण्यात पीडितेनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्राराची गंभीर दखल घेत आरोपींच्या तपासात पोलीस पथक रवाना झाले. पोलिसांनी तपास करत सतीश दासर या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. १५ तासात त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले.

दरम्यान, पोलीस तपासात आरोपी हा विद्यार्थीनीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला त्रास देण्यासाठी तिचा आंघोळ करताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून पीडितेला पाठवला. यानंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान पोलीस आरोपीची चौकशी करत असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *