
Pimpri Chinchwad : बिहार राज्यातून येऊन देहूरोड मध्ये प्रेयसीच्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. १९ वर्षीय आरोपी सनी सिंग राजपूत आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच बिहारमधील गावात असल्यापासूनचे प्रेमसंबंध होते. पण, काही कारणामुळे १६ वर्षीय प्रेयसीच कुटुंब देहूरोड येथे आलं. ती शाळेत शिक्षण घेत होती. सनी हा तिच्या संपर्कात होता. प्रेमसंबंध असल्याने त्यांचं नेहमीच फोनवर बोलणं व्हायचं.
अशातच १६ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचे हत्या झालेल्या दिलीप मौर्या सोबत सुत जुळले. दोघांचं एकमेकांवर प्रेम होते. याबाबत प्रेयसीच्या बोलण्यातून आरोपी प्रियकर सनी राजपूत ला कुणकुण लागली. प्रेयसीकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यांचं फोनद्वारे अनेकदा बोलणं झालं. प्रेयसीला सोडण्यावरून सनी आणि दिलीप यांच्यात वाद ही झाले. दिलीप मौर्या ला धमकी देण्यात आली.
|
|
अखेर बुधवारी ११ जून रोजी बिहारमधून सनी राजपूत आला त्याने प्रेयसीचा मित्र दिलीप ला फोनद्वारे संपर्क केला. आपण भेटून हे सर्व प्रकरण मिटवू अस त्याला पटवून सांगितलं. दिलीप ने ही होकार दिला. सनी ने दिलीप ला रात्री दहा च्या सुमारास देहूरोड येथील मोकळ्या पटांगणात बोलावलं. दिलीप ने सोबत चुलत भाऊ अरुण मौर्या ला घेतलं. दोघे सनी ला भेटायला गेले.
काही मिनिट त्यांच्यात प्रेयसीवरून शाब्दिक वाद झाले. तेवढ्यात तयारीत आलेल्या सनी राजपूत ने थेट दिलीप मौर्या च्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. हे बघून चुलत भाऊ मध्ये पडला. सनी ने अरुण मौर्या च्या छातीत चाकू भोकसला. घनास्थळावरून आरोपी प्रियकर सनी तिथून पसार झाला. दोघे ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही मिनिटांनी याबाबत पोलिसांना माहिती मिळताच दोघांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, पण दिलीप गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेला होता. अरुणवर अद्याप ही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना केली. आरोपी सनी हा गुजरात ला गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुजरातमधील बडोदा गाठलं. तिथं असलेल्या ३० ते ४० कंपन्या पिंजून काढल्या. पैकी एका कंपनीत सनी हा लपून बसला होता. त्याला तिथून अटक करण्यात आली. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


