
Srinagar : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी काश्मीर खोऱ्यात सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केला. ‘‘वेगळ्या काश्मीरच्या नावाखाली दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ‘आमच्या नावाखाली दहशतवाद माजवू नका,’’ असा इशारा यातून देण्यात आल्याचे मानले जात आहे.
श्रीनगरसह काश्मीरमधील विविध ठिकाणी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने बुधवारी काश्मीर बंदची हाक देण्यात आली होती. काश्मीर ट्रेडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, हॉटेलिअर्स असोसिएशन आणि ट्रान्सपोर्टर्स संघटनांसह समाजातील विविध स्तरांतून ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), पीपल्स कॉन्फरन्स (पीसी) आणि इतर काही संघटनांनीही काश्मीर बंदला आपला पाठिंबा जाहीर केला. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार मागील कित्येक वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे.
|
|
जम्मू-काश्मीरमधील सर्व स्तरांतील नागरिकांनी या हल्ल्याच्या निषेध केला. ‘‘असे व्हायला नको होते. काश्मीरच्या आणि इस्लामच्या नावाखाली हल्ले करणे चुकीचे आहे’’ असे मत हाजी बशीर अहमद दार यांनी व्यक्त केले. ‘‘येथील दहशतवाद संपविण्यासाठी सरकार जे धोरण राबवेल त्यात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत,’’ असे मत कुलगाम येथील फळउत्पादक जी. एम. बांडे यांनी व्यक्त केले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील शैक्षणिक संस्थांनीदेखील बंदला पाठिंबा दिला होता.
जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असल्यानेच पर्यटकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. येथील पर्यटकांची संख्या घटली, तर त्याचा परिणाम थेट स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल.
- महंमद इक्बाल, कुलगाम येथील व्यावसायिक
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




