
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील एका बँकेचा संचालकासह तांत्रिक सहायक कर्मचारी या गुन्ह्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी बँक खात्यांचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. पंजाब), बाबाराव उर्फ ओंकार भवर (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५, रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी, मुंबई), निखील उर्फ किशोर जगन्नाथ सावंत (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता), केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालायने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
|
|
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेने एका ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून वेळोवेळी एक लाख ६० हजार रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यापैकी काही रक्कम वाघोलीतील एका बँक खात्यात जमा झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरे याला ताब्यात घेतले. तांत्रिक तपासात आरोपी गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओंकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.
सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, मेमाणे, हवालदार चव्हाण, संदीप पवार, दिनेश मरकडे, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, जमदाडे, सोनुने यांनी ही कामगिरी केली.
आरोपी गोविंद सूर्यवंशी वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को-ऑप बंँकेचा संचालक आहे. रोहित कंबोज या बँकेतील तांत्रिक सहायक (टेक्निशियन) आहे. डिगीव्हेंटरी, वननेस, रजत सेल नावाने त्यांनी डिजिटल मार्केटींग कंपनी सुरू केली होती. आरोपी सूर्यवंशी आणि कंबोज हे आभासी चलन गुंतवणूक व्यवहार करायचे. दोघांनी ही रकम जब्बरसिंह पुरोहित याच्याकडे दिली होती. बँक खात्याचा गैरवापर प्रकरणात निखिल सातव यालाही अटक करण्यात आली.
आरोपींनी सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला अहे. ‘नॅशनल सायबर क्राईम पोर्टल’वर त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात २९ गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी देशभरातील वेगवेगळ्या शहरात दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपींचे दुबई, पश्चिम बंगाल, गुजरातमधील काही जणांशी लागेबांधे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. सायबर गुन्हे करताना आरोपींनी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



