
Pune : साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील सततचा विलंब पाहता कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेला पत्र पाठवून, कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
कोरेगाव पार्क–बंडगार्डन परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. दीड वर्ष उलटल्यानंतरही तीन खांबांचे काम प्रलंबित असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने विलंबामागे तांत्रिक अडचणींचा दाखला देत बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. लष्कर भागाला पाणीपुरवठा करणारी १००० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि त्या ठिकाणी असलेली रेल्वे लाईन ही प्रमुख अडचण ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कामादरम्यान रेल्वे ट्रॅकला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पर्यायी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांत पूल पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला आहे.
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पुलाच्या कामामुळे कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, बंडगार्डन आणि साधू वासवानी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. साउथ मेन रोडकडील अंडरपास बंद असल्याने सर्व वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे, परिणामी प्रवासाचा वेळ तिपटीने वाढला आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक समन्वय न साधल्यानेच हे प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे.
पोलिस आयुक्तांचे आक्षेप
पोलिस आयुक्तांनी पत्रात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:
- सुरुवातीला नेमलेले वाहतूक वॉर्डन काढून घेतल्याने पोलिसांवर ताण वाढला
- सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही
- कामाचा वेग अत्यंत संथ असून पुढील वर्षभरातही पूर्णत्वाची शक्यता कमी
- विलंबासाठी जबाबदार कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी
महापालिकेची भूमिका
महापालिकेनुसार, रेल्वे हद्दीत येणाऱ्या भागासाठी ‘ओपन वेब गर्डर’च्या डिझाइनमध्ये बदल सुचवण्यात आले होते, ज्यास मंजुरी मिळण्यासाठी सुमारे नऊ महिने लागले. तसेच, मुख्य जलवाहिनी स्थलांतरित होईपर्यंत पुढील काम करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाची अधिकृत मुदत २४ महिने (पावसाळा वगळून) असून मे २०२६पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



