
Uday Samant on Shivsena MLA’s Unhappy over dropped form Cabinet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी (१५ डिसेंबर) विस्तार झाला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी उघड केली आहे. सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत व छगन भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे. शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते तानाजी सावंत नागपूरमधील हिवाळी अधिवेशून अर्ध्यात सोडून पुण्याला रवाना झाले.
“आता मंत्रीपद दिले तरी स्वीकारणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय शिवतारे यानी दिली आहे. यावर शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, “आमचे ५७ आमदार आहेत आणि ११, १२ मंत्रिपदं आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो”.
शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे नाराज असून दोघेही अधिवेशन सोडून निघून गेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी उदय सामंत यांना विचारल्यावर ते म्हणाले, “एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील.
|
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला? |
तसेच जे मंत्री झालेत त्यांच्यामध्ये कोणाची काही नाराजी असेल तर ती देखील दूर करणं आवश्यक आहे. आम्ही शिवसेना म्हणून विस्ताराने त्यावर काम करत आहोत. शिवसेनेत यावर चर्चा होत आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे ही शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी आहे. दोघेही मंत्री होते, त्यांना लवकरात लवकर आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री बोलावून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. परंतु, तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात आहे ते या दोघांच्या मनात नसेल, याची मी सर्वांना खात्री देतो”.
…तर दोन तीन महिन्यांत आमचं मंत्रिपद काढून घेतलं जाईल : उदय सामंत
उदय सामंत म्हणाले, “आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र आहेत. परंतु, आम्हाला ११ ते १२ मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यापैकी मंत्रिपद कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. अशावेळी वरिष्ठांचा कस लागतो. त्यानंतर कोणी नाराज असतील तर त्यात वरिष्ठांचा दोष नसतो. मी चांगलं काम केलं नाही तर अडीच वर्षानंतर माझ्या जागी दुसऱ्या नेत्याला मंत्री केलं जाईल असं सांगितलं जात आहे. परंतु, अडीच वर्षे कशाला, मी जर चांगलं काम करत नसेल तर दोन-तीन महिन्यांत देखील माझं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं. दोन-तीन महिन्यात चांगलं काम केलं नाही तर आमचे नेते आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात, याची आमच्या मनात भीती आहे. त्यामुळे आम्हाला जनतेला अभिप्रेत असं काम करावं लागेल. सर्व नेत्यांना आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. महायुतीला न्याय द्यावा लागेल”.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
