
Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१८ सप्टेंबर) झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजनेला (पीएम – आशा) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या या योजनेसह रब्बी हंगामासाठी पोषणमूल्य आधारित रासायनिक खतांच्या अनुदानासाठी २४ हजार कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण अभियानाला (पीएम – आशा. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून २०२५-२६ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव मिळावा, ग्राहकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
|
Pune : नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण |
केंद्र सरकारने मूल्यसमर्थन योजना (पीएसएस) आणि मूल्य स्थिरीकरण फंड (पीएसएफ) या दोन योजनांचे एकत्रीकरण करून पीएम-आशा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाने खरेदीचे संरक्षण मिळणार आहे. शेतमालाच्या दरातील चढ-उतार टाळून शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यात येईल. तसेच, ग्राहकांना वाजवी दरात वर्षभर अन्नधान्य उपलब्ध होईल, याची काळजी घेण्यात येणार आहे.
अशी होणार अंमलबजावणी
- पहिल्या टप्प्यात कडधान्य, तेलबिया आणि खोबऱ्याची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २५ टक्के खरेदी करण्यात येईल. ही खरेदी नाफेड, एनसीसीएफसारख्या संस्थांच्या माध्यमातून होईल.
- हमीभाव आणि प्रत्यक्षात झालेल्या खरेदीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.
- बाजारात टंचाई होऊन, दरवाढ झाल्याच्या काळात या संस्थांकडून वाजवी दरात त्यांची विक्री करण्यात येईल, जेणेकरून ग्राहकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध होईल.
रब्बी हंगामातील खतांसाठी २४ हजार कोटी
केंद्र सरकारने रब्बी हंगामातील रासायनिक खतांसाठी पोषणमूल्य आधारित २४,४७५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जागतिक बाजारातील खतांच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम रब्बी हंगामावर होऊ नये, शेतकऱ्यांना वाजवी दरात रासायनिक खते मिळावीत, यासाठी ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५, या काळात रब्बी हंगामातील पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांसाठी खत कंपन्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सरकारने नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मूळ किंमत निर्धारित केली आहे. त्या किमतीवर अनुदान दिले जाईल.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel




