
Thane : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करुन अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेची दाहकता अद्याप शमलेली नाही. तोच आता बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे.
ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तर, आपल्या अवघ्या साडेवर्षांच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे.
|
Mumbai Monsoon Update : उपनगरांत पावसाचे पुनरागमन, शहरात पावसाची प्रतीक्षा |
याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली.
इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी.
निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.
या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जत्था लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आलं. तसेच, बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असं सांगितलं. तसेच, आज बदलापुरात कडकडीत बंद पाळला जात आहे. रिक्षा, दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बदलापुरात तणाव वाढताना दिसत आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



