
Pune : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ‘समन्स’ मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट निघू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, तक्रारीत तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला आहे.
गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम २०२’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. याची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.
|
Mumbai : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कल यंदा कोणत्या शाखेकडे? |
.. तर दोन वर्षे तुरुंगवास
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २०० अन्वये तक्रार दाखल आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कमाल दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.
‘समन्स’ पूर्तता महत्त्वाची
या प्रकरणात राहुल गांधी यांना ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाल्यास, त्याचा अहवाल न्यायालयात येईल. त्यानंतरही राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत, तर अटकेचे वॉरंट काढले जाते. परंतु, ‘समन्स’ बजावण्याची पूर्तता झाली नसेल, तर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या प्रक्रियेच्या पूर्ततेवर राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




