11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्यान ही बाराही महिने वाहणारी नदी असायची, पण आता ती कधी-कधी कोरडी पडते. मला वाटायचे की तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील माझ्या मूळ गावी ती कायम अशीच दुथडी भरून वाहत राहील. मला तो पोंगलही खूप आठवतो, जो मला दररोज सकाळी 6 वाजता कावेरीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिरात प्रसाद म्हणून मिळायचा. नदीत पोहून आल्यावर त्या गरम पोंगलची चव दोन कारणांमुळे नेहमीच अद्भुत लागायची- एक, पोहल्यामुळे भूक वाढते आणि दोन, देवाच्या आशीर्वादामुळे त्यांचा प्रसाद आणखी चविष्ट बनतो.
मला तो वडा-सांबारही आठवतो, जो लहानपणी रविवारी माझे आजोबा मला खाऊ घालायचे. ‘वेंकटा लॉज' नावाच्या हॉटेलमध्ये तो एका आण्याला (सहा पैसे) मिळायचा. तिथे वेटर ॲल्युमिनियमची बादली घेऊन उभा असायचा आणि तो कंटाळा न करता हवा तेवढा सांबार वाढायचा. ही माझ्या आयुष्यातील छोटी-छोटी आश्चर्ये होती. मी नेहमीच त्यांना हलक्यात घेतले, पण आज जेव्हा मी जास्तीच्या सांबारच्या छोट्या वाटीसाठी 5 रुपये देतो तेव्हा मला ती बादली व त्या वेटरचा चेहरा आठवतो. त्या हॉटेलने आतापर्यंत आपल्या मूळ मालकांनंतर तीन नवे मालक पाहिले आहेत आणि नव्या मालकाची मुले याचे रूपांतर दुसऱ्या एखाद्या व्यवसायात करू शकतात.
याहून मोठ्या पातळीवर मला अरबी समुद्र व किनाऱ्यांची उणीव भासते. समुद्र तिथेच आहे- पण माझे काम मला अनेकदा- अगदी रविवारीही- त्या किनाऱ्यालगतच्या मुंबईपासून दूर घेऊन जाते, जिथे मी राहणे पसंत केले आहे.
लोक आयुष्यातील आश्चर्यांना हलक्यात घेतात. पण ती प्रत्येक रूपात व आकारात आपल्यासमोर येतात. मोठी आश्चर्ये थक्क करणारी असू शकतात, पण छोट्या आश्चर्यांनी आपले आयुष्य बनते. जीवनप्रवासाची दु:खद बाजू ही आहे की या छोट्या-छोट्या आश्चर्यांना हरवण्याची वाईट सवय असते. गावातील छोट्या-छोट्या झोपड्यांचे रस्त्याच्या कडेला प्रवेशद्वार असलेल्या दोन-तीन मजली सिमेंटच्या इमारतींमध्ये रूपांतर झाल्याने ग्रामीण सौंदर्याला आपल्यापासून दूर नेले आहे- नगरपालिकेची बस वेगात गेल्यावर उडणाऱ्या कोंबड्या, सकाळी ताज्या अन्नाच्या प्रतीक्षेत घराबाहेर बसलेली गाय, इकडे-तिकडे सुस्तावलेला अन् पाय ओढत चालणारा व कधी-कधी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी भुंकणारा एखादा कुत्रा, जाणाऱ्या सायकलींच्या घंटीचा आवाज व बाहेर उभ्या असलेल्या दशकं जुन्या झाडावर किलबिल करणारे पक्षी... नुकतीच जेव्हा माझी मुलगी आली तेव्हा मी तिला आवर्जून नागपुरातील माझ्या शाळेत घेऊन गेलो आणि तिला त्याच बाकावर बसवले, जिथे मी शिकायचो. मी तिला शाळेबाहेर टोपली घेऊन बसलेल्या वृद्ध महिलेकडून बोरे विकत घ्यायला लावली. एका छोट्याशा हनुमान मंदिरासमोर त्याचप्रमाणे उभे राहून प्रार्थना करायला लावली, जशी मी परीक्षा देण्यापूर्वी करायचो. तिला हे सर्व खूप आवडले.
भूतकाळातील आठवणी जागवणाऱ्या ठिकाणांबद्दल भावुक होणे आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर जतन करून ठेवणे स्वाभाविक आहे. वयानुसार माझ्यामध्ये ही प्रवृत्ती आणखी गडद होत गेली आहे. त्यामुळेच आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना ओळखणे व शक्य होईल तितके त्यांना जपून ठेवणे गरजेचे आहे. उदासीन, निनावी जग व असे जग, ज्यामध्ये जीवन व नावीन्याची चमक असेल, जे जगण्याचा आनंद घेता येईल- या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी एकमेव गोष्ट ही की गावाकडच्या शाळांबाहेर बोरे विकणारी वृद्ध महिला केवळ रोख रक्कमच स्वीकारेल. कारण ती मर्यादित नफ्यावर काम करते व डिजिटल पेमेंट घेऊन कमिशन देऊ शकत नाही.

हा कॉलम ऐकण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
शहर
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
- बांगलादेशच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण! नॅशनल प्लेयर नईम हसनच्या तक्रारीने खळबळ, तीन पोलीस अधिकारी निलंबित
- शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेले, ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत
महाराष्ट्र
- लंडन: लातूरच्या इंजिनिअरची जीवनयात्रा संपली; बोडका गावात शोककळा
- नंदुरबार: हातात 'मन में है विश्वास' पुस्तक आणि थेट विश्वास नांगरे-पाटलांशी संवाद; विकास खारगेंनी पूर्ण केले तरुणाचे स्वप्न
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
गुन्हा
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
























Subscribe to my channel


