
Pune : मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक बिघाडाचा फटका पुणे विमानतळावरील विमानसेवेला शुक्रवारी बसला. विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना हाताने लिहून बोर्डिंग पास प्रवाशांना द्यावे लागले. या प्रक्रियेला खूप विलंब लागत असल्याने शुक्रवार आणि शनिवारची ४० विमाने रद्द करण्यात आली आहेत. याचबरोबर अनेक विमानांना विलंब होत आहे.
मायक्रोसॉफ्ट ठप्प झाल्याने विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. यामुळे विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास विलंब होत होता. प्रवाशांना हाताने लिहून बोर्डिंग पास देण्याची वेळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर आली होती . पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी २१ विमाने आणि येणारी १९ विमाने अशी ४० विमाने रद्द करण्यात आले. याचबरोबर अनेक विमानांना विलंब होत आहे. विमाने रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
|
Pune : देशात मक्याचा खडखडाट, प्रतिकिलो ३० रुपयांवर; कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम |
विमान कंपन्यांकडून प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती कळविण्यात येत आहे. विमानतळावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याचे प्रयत्न भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सुरू आहेत. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठीही पावले उचलली जात आहेत. विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या खानपानाची व्यवस्थाही केली जात आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, की पुणे विमानतळावरून दिवसा विमानांची संख्या कमी आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी विमानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवसभर मोठी समस्या निर्माण झाली नाही. तांत्रिक अडचणीमुळे विमान कंपन्यांचे कर्मचारी प्रवाशांना हाताने लिहून बोर्डिंग पास देत होते. या प्रक्रियेला उशीर होऊन काही विमानांना विलंब झाला. विमान कंपन्यांची ऑनलाइन यंत्रणा सुरू न झाल्याने शुक्रवारी आणि शनिवारी नियोजित विमाने रद्द करण्यात आली आहेत.
समस्या सोडविण्यासाठी पावले
याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, की मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील बिघाडामुळे जगभरात अनेक क्षेत्रांना फटका बसला. त्यात भारतातील विमान कंपन्यांच्या ऑनलाइन यंत्रणेचाही समावेश आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तांत्रिक बिघाडाबद्दल प्रवाशांना वेळीच सूचना द्याव्यात, असे निर्देश विमान कंपन्यांना दिले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आमचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

