
Pune : मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्ररवाल यांनी दिली असल्याचे चालकाने त्याच्या जबाब सांगितले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आरोपीने ज्या पबमध्ये मद्यपान केले त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २२) सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
|
Pune Dagdusheth Ganpati : वैशाख पौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठच्या बाप्पाला' ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य! |
आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्ररवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबत चालकाने नमूद केले आहे की, आरोपीचे वडील विशाल अग्ररवाल यांनी त्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती, असे जबाब नमूद आहे.
अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल व क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल व क्लबमध्ये दारू मिळते याची माहीती अग्ररवाल यांना होती. तरी देखील त्यांनी त्याला पार्टीला जाऊ दिले. पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा स्वतःचे क्रेडीटकार्ड वगैरे दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी कोणकोण होते? या बाबत आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.
गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यायावतीने ऍड. सुधीर शहा, ऍड. अमोल डांगे आणि ऍड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तीनही आरोपींना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघांनाही येरवडा पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवण्यात येणार आहे.
अपघातग्रस्त मोटार ही बंगळूरमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अग्ररवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे.
त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. गाडीत तांत्रिक बिघाड आहे होता तर ती गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिला? असा सवाल उपस्थित करत गाडीबाबतची पूर्वकल्पना असताना देखील त्याला ती चालवयला देणे गंभीर आहे, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयात सांगितले.
शहर
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




