
IPL 2024 LSG vs RR : राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार खेळ करीत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने आठपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मागील तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करणारा राजस्थानचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स संघाशी दोन हात करणार आहे.
याप्रसंगी विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नांची शिकस्त करील. विजयाच्या हॅट्ट्रिकचे लक्ष्य डोळ्यांसमोर असलेल्या लखनौच्या संघाचेही लक्ष्य प्ले-ऑफचे असणार आहे.कर्णधार संजू सॅमसन (३१४ धावा), रियान पराग (३१८ धावा), जॉस बटलर (२८५ धावा) या तीन फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. राजस्थानसाठी ही जमेची बाजू ठरत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने धडाकेबाज शतकी खेळी साकारताना आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले. यामुळे राजस्थानचा संघ फलंदाजी विभागात आणखी भक्कम झाला आहे. शिमरोन हेटमायर व रोवमन पॉवेल हे फलंदाजही राजस्थानच्या दिमतीला आहेत.
|
|
राजस्थानचा फलंदाजी विभाग जितका तगडा आहे, त्यांचा गोलंदाजी विभागही तेवढाच प्रभावी आहे. युझवेंद्र चहल (१३ विकेट), ट्रेंट बोल्ट (९ विकेट), आवेश खान (८ विकेट), संदीप शर्मा (६ विकेट) हे गोलंदाज प्रभावी कामगिरी करीत आहेत. रवीचंद्रन अश्विनचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय आहे, पण सध्यातरी राजस्थानवर याचा विपरित परिणाम झालेला नाही. प्ले-ऑफ लढतींच्या आधी तो फॉर्ममध्ये आल्यास राजस्थानसाठी ही आनंददायी बाब असणार आहे.
राहुल, पूरन, स्टॉयनिसमुळे फलंदाजी भक्कम
लखनौच्या फलंदाजी विभागाची मदार कर्णधार के. एल. राहुल (३०२ धावा), निकोलस पूरन (२८० धावा), मार्कस स्टॉयनिस (२५४ धावा) यांच्या खांद्यावर अवलंबून आहे. क्विंटॉन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बदोनी व कृणाल पंड्या यांना खेळात सातत्य दाखवण्याची गरज आहे.
मयंक यादवच्या पुनरागमनाच्या आशा
लखनौच्या संघाला यंदाच्या मोसमात मयंक यादवच्या रूपात युवा वेगवान गोलंदाज लाभला. त्याने तीन सामन्यांमधून सहा फलंदाज बाद करीत आपली चुणूक दाखवली. त्याच्या गोलंदाजीतील वेगाचे कौतुक चोहोबाजूंनी होऊ लागले, पण दुखापतीमुळे तो मागील काही सामन्यांत खेळू शकला नाही. आता उद्या त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लखनौसाठी ही दिलासा देणारी बाब ठरणार आहे. यश ठाकूर, मोहसिन खान, मॅट हेन्री व रवी बिश्नोई या गोलंदाजांना राजस्थानच्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




