
Madha Loksabha Election 2024 : माढा लोकसभा मतदार संघामध्ये अभयसिंह जगताप यांचे बंड शमवण्यात शरद पवार यांना यश मिळाले आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बंडाच्या भूमिकेमध्ये असलेल्या अभय जगताप यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आम्ही साहेबांना एकटं सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याचसोबत 'महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.' असल्याचे अभयसिंह जगताप यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघात महविकास आघाडीकडून इच्छुक असणारे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे उमेदवार अभय जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असून बंड पुराकरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता त्यांची मनधरणी करण्यात शरद पवारांना यश आले आहे.
|
Supriya Sule : 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत |
शरद पवार यांनी मध्यस्थी करत अभय जगताप यांची समजूत काढली. अखेर माढ्यातील हे बंड थोपवण्यात शरद पवार यांना यश आलेले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे. असामध्ये महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना अभय जगताप यांनी सांगितले की, 'या वाईट परिस्थितीमध्ये शरद पवारसाहेबांना एकटे सोडणार नाही.' तसंच, 'त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेऊ.', असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाराज अभयसिंह जगपात यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते माढा लोकसभेसाठी इच्छुक होते. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज झाले होते. माढा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. जयंत पाटील यांनी त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरू नका अशी विनंती देखील केली होती.
अभयसिंह जगपात यांनी सांगितल होते की, 'मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. मी अनेक स्वप्न माढा लोकसभा मतदारसंघातून पाहिली होती. पण स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीत. मी कुठल्याही उमेदवाराचे काम करणार नाही. मी स्वतः अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे'.
शहर
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
महाराष्ट्र
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
- जळगाव: आईच्या डोळ्यादेखत काळाचा घाला! शेतात काम करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत.
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!


























Subscribe to my channel



