Nanded Political News : अशाेक चव्हाणांसाठी धक्कातंत्र, भाजप खासदारांच्या बहिणीचे काँग्रेसच्या दिशेने पाऊल ?

Nanded Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्या नंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाचे गणिते पूर्णतः बिघडले आहे. काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पडू लागले आहे. त्यातच काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी काही बड्या नेत्यांना पक्षात घेण्याची हालचाली सुरु झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील एक मोठ नाव लोहा- कंधार विधानसभेचे  शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याबाबतची सूत्रांनी खात्रिशिर माहिती दिली.

Radhakrishna Vikhe Patil : रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती

आशाताई शिंदे या भाजपाचे खासदार प्रताप पाटील- चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. आशाताई यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण भावाची लढत हाेईल अशी शक्यता नाकारता येत नाही. या सर्व हालचालींमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *