कर्जत (जि. रायगड): रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पोलीस दलाला कलंक लावणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कर्जत-गुंडगे दरम्यानच्या रेल्वे पादचारी पुलावरून रात्रीच्या वेळी घराकडे जाणाऱ्या एका महिलेचा मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या सहकाऱ्यासह पाठलाग करत विनयभंग केला. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (DySP) ताफ्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी प्रमोद मारोती पाटील आणि त्याचा साथीदार महेंद्र भगवान भंडारे यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडली घटना? मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला आणि तिची बहीण कर्जत बाजारपेठेतून गुंडगे येथील आपल्या घरी परत जात होत्या. जकात नाका येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील आणि महेंद्र भंडारे या दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. "चल येते का चल" असे म्हणत अश्लील कमेंट्स करून त्यांनी महिलेची छेड काढली.
बहिणीने बनवला व्हिडिओ; मध्यरात्री पोलीस ठाण्यात राडा: हा गैरप्रकार घडत असताना तक्रारदार महिलेच्या बहिणीने प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईल फोनमध्ये संपूर्ण घटनेचे चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) केले आणि आपल्या दाजींना याची माहिती दिली. महिलेच्या पतीने तातडीने घटनास्थळी पोहोचून जाब विचारला असता, छेड काढणारा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी कर्जत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामस्थांचा प्रचंड दबाव आणि आंदोलनानंतर अखेर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोषी पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील व महेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


